इंग्लंड दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय महिला टीम ‘या’ देशाच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता, टी-20 व वनडे मालिकेचा रंगणार थरार
भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज (Photo Credit: Facebook)

India Women's Tour of Australia 2021: कोविड-19 महामारी काळात फक्त एक आंतरराष्ट्रीय मालिका खेळणारी भारतीय मालिका टीम (India Women's Cricket Team) जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकते. आगामी इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया (Team India) एकमात्र कसोटी सामना त्यानंतर 3 सामन्यांची वनडे आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मेगन शुटने (Meghan Schutt) सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाच्या डाऊन अंडर दौऱ्याबाबत संकेत दिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) अद्याप वेळापत्रक निश्चित केले नाही. या दौर्‍यावर एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळणे अपेक्षित आहे. “आम्हाला सप्टेंबरच्या मध्यात भारताविरुद्ध मालिका खेळायची आहे. म्हणून काही शिबिरे आयोजित केली जातील. मला वाटते की एक डार्विनमध्ये असेल, जेथे जबरदस्त थंडी असेल आणि त्यानंतर भारतविरुद्ध मालिका होईल. यानंतर बिग बॅश, अ‍ॅशेस, वर्ल्ड कप आणि आशा आहे की राष्ट्रकुल खेळ होईल,” शुटने म्हटले. (India Women Squad For England Tour 2021: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, शेफाली वर्माला संघात स्थान)

बीसीसीआयने आपल्या शिखर परिषदेच्या शेवटच्या बैठकीत न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया दौर्‍यास मान्यता दिली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या होम सिरीजलाही मान्यता देण्यात आली. ऑस्ट्रेलिया दौरा सुरुवातीला यावर्षी जानेवारीमध्ये होणार होता, परंतु कोविड-19 महामारी दरम्यान वर्ल्ड कप 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्याला पुढे ढकलण्यात आले. दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेटपटू 30 सप्टेंबर 2020 पासून कोणत्याही कराराशिवाय आहेत आणि 2 जून रोजी इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणापूर्वी ते नवीन वार्षिक करारावर स्वाक्षरी करतील की नाही हे त्यांना ठाऊक नाही. या दौर्‍यावर भारतीय महिला संघाला एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल. गेल्या जवळपास सात वर्षा भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळणार आहे. मिताली राज या फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसेल तर टी-20 मालिकेत हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची जबाबदारी असेल.

दुसरीकडे, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सचिव जय शहा यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणाची दखल घेतली जात आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी रात्री करण्यात आली असून 18 मे रोजी खेळाडूंना मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे. शिवाय, भारतीय खेळाडू पुरुष खेळाडूंप्रमाणेच दोन आठवडे क्वारंटाईन राहुल संपूर्ण टीम चार्टर्ड विमानाने ब्रिटनला रवाना होतील असे समजले जात आहे.