टीम इंडिया बुधवारी, 14 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरा आणि अंतिम वनडे सामना खेळण्यास सज्ज आहे. भारत-विंडीज (West Indies) मधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आणि दुसऱ्या सामन्यात देखील पावसामुळे अनेकदा व्यत्यय आणला होता. पण, या सर्व गोष्टींना न जुमानता टीम इंडियाने आक्रमक खेळी केली आणि सामना जिंकला. दुसऱ्या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. आणि आता दोन्ही संघ पुन्हा एकदा पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स क्लबच्या (Queens Club) मैदानात या मालिकेत आमने-सामने असतील. पण त्याआधी भारतीय संघातील खेळाडूंनी काही काळ विश्रांती करत भटकंती केली. शिखर धवन (Shikhar Dhawan), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यासारख्या खेळाडूंनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. (IND vs WI ODI 2019: तिसऱ्या वनडेआधी पोर्ट ऑफ स्पेन येथे श्रेयस अय्यर बनला Tarzan, पहा व्हिडिओ)
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाशी झालेल्या सहकार्यामुळे बहुतेक भारतीय खेळाडूंचा चांगला मित्र असलेला किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याने देखील धवन आणि इतरांसह बोट राईडचा आनंद लुटला. धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर संघातील सहकारी आणि पोलार्डसह काही व्हिडिओ आणि फोटोज शेअर केली आहेत. पहा फोटोज:
एका छोट्या विश्रांतीनंतर भारतीय संघातील खेळाडू 14 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यासाठी नेट्समध्ये सराव करायला लागतील. मागील सामन्यात टीम इंडियाने क्वीन्स क्लबच्या मैदानावर विंडीजचा पराभव केला होता. कर्णधार विराट कोहली याचे शतक आणि भुवनेश्वर कुमार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 59 धावांनी मात केली. भारताने दिलेल्या 280 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र, एव्हिन लुईस आणि निकोलस पुरन यांनी दमदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. विंडीजचा संपूर्ण डाव 210 धावांत संपुष्टात आला.