आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये भारत (India)-वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात आज मॅंचेस्टर (Manchester) च्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर सामना होत आहे. सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत टीम इंडिया ने वेस्ट इंडिज समोर जिंकण्यासाठी धावांचे 269 आव्हान दिले आहे. पहिले गोलंदाजी करत वेस्ट इंडिज ने भारताला रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या रूपात पहिला मोठा धक्का दिला. रोहित 18 धावांवर बाद झाला. या नंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि के. एल राहुल (KL Rahul) नियंत्रण आपल्या हाती घेतले. मात्र, राहुल जास्त काळ विराट ला साथ देऊ शकला नाही आणि 48 धावांवर बाद झाला.
वेस्ट इंडिज विरोधात 37 धावांची खेळी करत विराटनं 20 हजार धावांचा टप्पा पार केला. विराटनं हे पराक्रम करताच विजय शंकर (Vijay Shankar) 14 धावांवर बाद झाला. पाचव्या क्रमांकावर एम एस धोनी (MS Dhoni) च्या जागी केदार जाधव (Kedar Jadhav) ला पाठवण्यात आले आहे, पण त्याचा काही फरक पडला नाही आणि जाधव 7 धावांवर बाद झाला. केदार पाठोपाठ विराट 72 धावा करत माघारी परतला. त्यानंतर धोनी ने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) च्या साथीने मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी घेतली. धोनीने 56 तर हार्दिकने 46 धावा केल्या. हार्दिक ने आक्रमक खेळी करत धोनी ला साथ दिली पण मोक्याच्या क्षणी आपली विकेट गमावली. वेस्ट इंडिजसाठी केमार रोच (Kemar Roach) ने 10 ओव्हर मध्ये 36 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
विश्वकपमध्ये सध्या भारतीय संघाची सध्या विजयी घौडदौड सुरु आहे. टीम इंडिया ने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. आज वेस्ट इंडिजला नमवत भारत सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करू शकतो.