Shardul Thakur (Photo Credit: Twitter)

टी-20 मालिकेवर विजय विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ (Team India) वेस्ट इंडीजसोबत (West Indies) एकदिवसीय सामना खेळण्यासाठी (India Vs West Indies ODI Match) सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 16 डिसेंबर रोजी चेन्नई येथे खेळला जाणार आहे. परंतु, याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का लागला आहे. भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला दुखापत झाली असून त्याच्या जागेवर मुंबईचा खेळाडू शार्दुल ठाकूर याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार यांच्या जागेवर संधी मिळवलेला शार्दुल ठाकूर उत्तम कामगिरी बजावतील, अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना चेन्नई येथे रंगणार आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा जखमी झाला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध मुंबईत झालेल्या अखरच्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमार जखमी झाला होता. त्याला पुन्हा हर्नियाचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. यामुळे भुवनेश्वर कुमारच्या जागेवर शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे, असे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शार्दुलने बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळली होती. त्यानंतर मुंबई संघाकडून रणजी स्पर्धेत तो बडोदाविरुद्ध खेळला होता. हे देखील वाचा- ड्वेन ब्राव्हो याचे निवृत्तीमधून यू-टर्न; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे केले जाहीर

 

बीसीसीआय ट्विट-

एकदिवसीय भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकिपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.