
भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्यातील मैदानावरील मजबूत संबंध आपण यापूर्वी पाहिलं असेल. आता आम्हाला त्यांच्या मैदानाबाहेरील मजबूत मैत्रीची झलक पाहायला मिळाली आहे. अलीकडेच एका सोशल मीडिया यूजरने डावखुरा चायनामन कुलदीपला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण फिरकीपटू युजवेंद्रने त्या ट्रोलरला योग्य असे उत्तर देत त्याची बोलती बंद केली. सध्या टीम इंडिया (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात कोलकातामध्ये डे-नाईट टेस्ट सामना खेळला जात आहे. कुलदीपने नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या ईडन गार्डनवर सराव शेअर केला. प्रत्येकजण यूजरने त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. ईडन गार्डनमध्ये कुलदीपच्या चांगल्या आठवणी आहेत. 2014 पासून कुलदीप आयपीएल संघ केकेआरसाठी याच मैदानावर (ईडन गार्डन्स) खेळत आहे. (IND vs BAN 2nd Test: टॉस जिंकून बांग्लादेशचा फलंदाजीचा निर्णय, भारताच्या Playing XI मध्ये कोणताही बदल नाही)
या मॅचआधी आपला फोटो शेअर करत कुलदीपने कॅप्शनमध्ये लिहिले, '“ईडनमध्ये परतलो, येथे सुंदर आठवणी आहे. आमच्या पहिल्या डे-नाईट टेस्टसाठी उत्साहित." याच्यावर एका यूजरने प्रतिक्रिया देत लिहिले, "तुम्हाला मोईन आठवतो का?" यूजरची अशी कमेंट चहलला पसंत पडली नाही आणि त्याने मध्ये पडत कुलदीपचा बचाव करत म्हण्टले, "अनिक्रता, तू पहिल्यांदा निघून जा." यानंतर कुलदीपची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली.
View this post on Instagram
Back at the Eden 😍. Lovely memories here. Excited for our first ever day night test.✌🏻 #PinkBallTest
कुलदीप हा भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 6 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 6 कसोटी सामन्यांमध्ये 24 च्या उत्कृष्ट सरासरीने 24 आणि 53 वनडे सामन्यांमध्ये 23 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 4.9 च्या उत्कृष्ट रेटने 96 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने एका वनडे सामन्यात 5 विकेटदेखील घेतले आहेत. टी-20 मध्ये त्याने सर्वोत्कृष्ट केल्ली इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरमध्ये केली. या सामन्यात कुलदीपने 24 धावा देत 5 गडी बाद केले होते.