IND vs WI 2019: टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेआधी वेस्ट इंडिजला धक्का, क्रिस गेल याने घेतला क्रिकेटमधून ब्रेक, जाणून घ्या कारण
क्रिस गेल (Photo Credit: @ICC/Twitter)

वेस्ट इंडीज (West Indies) चा स्फोटक सलामी फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) म्हणाला की तो पुढील महिन्यात भारता (India) विरुद्ध होणाऱ्या तीन वनडे सामने खेळणार नाही आणि त्याऐवजी आपल्या 2020 च्या विश्वचषकवर लक्ष केंद्रित करणार आहे. वेस्ट इंडिज संघ डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान विंडीजला तीन आंतरराष्ट्रीयटी-20 आणि वनडे सामने खेळायचे आहे. गेलचं टी -20 सामन्यात गेल खेळणेही संशयास्पद आहे. “वेस्ट इंडीजने मला भारतविरुद्ध वनडे सामने खेळण्यासाठी बोलावले, पण मी खेळणार नाही,” असे ईएसपीएनक्रिकइन्फोला गेलने सांगितले. गेलने वेस्ट इंडीज क्रिकेट निवड समितीला आपल्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिज संघाचा भारत विरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची निवड पूर्ण झाली असून त्याची घोषणा या आठवड्यात होईल. (IND vs WI 2019: सुरक्षा कारणांमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध टी-20 मालिकेच्या स्थळांची झाली अदला-बदली, पाहा आता कुठे होणार सामने)

ऑस्ट्रेलियामध्ये आगामी बिग बॅश लीग (Big Bash League) मध्येही गेल खेळणार नाही. तो म्हणाला, "मी बिग बॅशसुद्धा खेळणार नाही. मी पुढे क्रिकेट कुठे खेळणार हे मला माहित नाही. माझे नाव बीपीएल (बांग्लादेश प्रीमियर लीग) पर्यंत कसे पोचले हे माहित नाही. माझा एका संघात समावेश करण्यात आला आहे आणि ते कसे घडले मला माहिती नाही." दरम्यान, वेस्ट इंडीज वनडे आणि टी-20 कर्णधार कीरन पोलार्ड याने अलीकडे म्हटले होते की, गेलच्या संघात असल्याने त्याला खूप आनंद झाला आहे. 40 वर्षीय गेल ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजकडून भारत विरुद्ध खेळला होता.

टी -20 लीगमध्ये त्याच्याशी चांगली वागणूक दिली जात नसल्यामुळे तो दु:खी असल्याचे गेलने सोमवारी सांगितले. गेलने सांगितले की सर्व लीगमध्ये त्याला मिळालेला आदर मिळत नाही ज्याच्यावर त्याचा हक्क आहे. गेल म्हणाला होता, "जेव्हा त्याच्या फलंदाजीने एक किंवा दोन सामन्यात धावा केल्या जात नाहीत तेव्हा अचानक तो संघासाठी ओझे बनतो. मी हे एका संघासाठी नाही तर बर्‍याच फ्रँचायझीसह खेळण्याच्या आधारावर बोलत आहे."