टीम इंडिया (Photo: BCCI Twitter)

टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटीतही आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिल्या मॅचमध्ये जिंकून विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने टॉस जिंकून पहिल्या बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. अँटिगुआ येथील नॉर्थ साऊंडच्या व्हिव रिचर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), रविचंद्र अश्विन (R Ashwin), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रिद्धिमान सहा (Wriddhiman Saha) यांचा टीम इंडियामध्ये समावेश झाला नाही. शिवाय रिषभ पंत (Rishabh Pant) याला पहिले प्राधान्य दिले आहेत. टीम इंडियाने टी-20 आणि वनडे मालिका जरी जिंकली असली तरी विंडीजविरुद्ध टेस्ट मालिका जिंकण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे. विंडीजला टेस्टमध्ये पराभूत करणे भारतीय संघासाठी कठीण असणार आहे. आजच्या सामन्यात विराटसेना पहिल्यांदा क्रमांक असलेली पांढरी जर्सी परिधान करून मैदानात उतरतील. (Live Streaming of IND vs WI, 1st Test Day 1: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर)

दरम्यान, कर्णधार विराट कोहली टी-20 आणि वनडे मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्यामुळे टेस्टमध्येही चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे. भारत-विंडीजमधील टेस्ट मालिकादेखील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक मालिकेला 120 गुण दिले जाणार आहेत आणि त्यात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ गुणतालिकेत आगेकूच करत राहणार आहे. त्यामुळे, भारत-विंडीज यांच्यात या 120 गुणांसाठीची शर्यत आजपासून सुरू होणार आहे.

असा आहे भारतीय आणि विंडीज संघ:

भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

वेस्ट इंडिज संघ: जेसन होल्डर (कॅप्टन), क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शाय होप, शामार ब्रूक्स, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, मिगुएल कमिन्स, रोस्टन चेस, शेनॉन गैब्रिएल, आणि केमार रोच.