IND vs WI 1st Test: अजिंक्य रहाणे याची एकाकी झुंज, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया 6 बाद 203
अजिंक्य रहाणे (Photo Credit: AP/PTI)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील पहिल्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात झाली. टीम इंडिया आणि विंडीज संघात 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाणार आहे. पहिल्या दिवसाखेर भारताने 6 विकेट गमावत धावा केल्या. पहिल्या दिवशी पावसाने सतत व्यत्यय आणल्याने फक्त 68.5 ओव्हर्सचा खेळ झाला. आजच्या पहिल्या सामान्य वेस्ट इंडिजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पहिले फलंदाजी करत भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. विंडीज गोलंदाजांनी चक्क 25 धावांवर 3 विकेट घेत भारताला मोठा धक्का दिला. मयंक अग्रवाल (Mayank Agrawal), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) काही खास करू शकले आणि स्वस्तात माघारी परतले. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) काहीच करू शकला नाही आणि फक्त 9 धावा केल्या, यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. कोहलीकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा होती, पण वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियल (Shannon Gabriel) याच्या गोलंदाजीवर आऊट झाला. गॅब्रियलने उसळता चेंडू कोहलीच्या ऑफ स्टम्पच्या दिशेने टाकला आणि कोहली मारण्यासाठी गेला आणि त्याचा झेल गलीमध्ये उभ्या असलेल्या ब्रुक्सने पकडला. (IND vs WI 1st Test Day 1: अँटिगामध्ये पहिल्या डावात विराट कोहली Fail, स्टिव्ह स्मिथ याला विराटपेक्षा चांगला फलंदाज म्हणत संतप्त नेटकऱ्यांनी केली टीका)

यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने सलामीला आलेल्या केएल राहुल (KL Rahul) याच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल 44 धावा करून बाद झाला. राहुल आणि रहाणेने 68 धावांची भागीदारी केली. हनुमा विहारी त्यानंतर फलंदाजीसाठी आला. राहणे सावध पण आक्रमक खेळी करत असल्याने विहारने देखील आपली सावध सुरुवात केली. मात्र, तो देखील फारसं काही करू शकला नाही. विहारीने 32 धावा केल्या.

नंतर, रहाणे आपले शतक पूर्ण करू शकला नाही आणि 81 धावांवर आऊट झाला. गॅब्रियलने त्याला बोल्ड केले. दरम्यान, उद्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा भारताच्या खेळीची सुरुवात करतील. पहिला दिवस संपेपर्यंत पंत आणि जडेजा धावांवर खेळात होते. विंडीजसाठी केमार रोच याने 34 धावा देत 3 गडी बाद केले तर गॅब्रिएलने २ विकेट्स मिळवल्या. रोस्टन चेस याला एक विकेट मिळाली.