IND vs WI 1st Test Day 1: अँटिगामध्ये पहिल्या डावात विराट कोहली Fail, स्टिव्ह स्मिथ याला विराटपेक्षा चांगला फलंदाज म्हणत संतप्त नेटकऱ्यांनी केली टीका
विराट कोहली (Photo Credits: Facebook)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात टी-20 आणि वनडे मालिकेतील फॉर्म कायम ठेऊ शकला नाही. विंडीजविरुद्ध पहिल्या डावात विराट फक्त 9 धावा करत माघारी परतला. विंडीजविरुद्ध सामन्यात टॉस जिंकून कर्णधार जेसन होल्डर याने पहिले गोलंदाजी करणायचा निर्णय घेतला. आणि त्यांनी उत्कृष्ट सुरुवात केली. भारतीय फलंदाजांनी विंडीज गोलंदाजांसमोर अक्षरशः लोटांगण घातले. भारताची आघाडीची फळी, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कोहली स्वस्तात बाद झाले. याआधी मर्यादित शतकारांच्या मालिकेतील विराटचा फॉर्म पाहता त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, आज मात्र त्याने सर्वांची निराशा केली. (IND vs WI 1st Test Day 1: रविचंद्रन अश्विन याला Playing XI मधून वगळल्याने भडकले नेटिझन्स, म्हणाले ही सर्वात 'विचित्र निवड')

विंडीजविरुद्ध पहिल्या डावात कोहली फक्त 9 धावा करत शॅनन गॅब्रिएल (Shannon Gabriel) याच्या चेंडूवर झेल बाद झाला. कोहली बाद होताच सोशल मीडियावर पुन्हा एका टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात चांगला फलंदाज कोण अशी चर्चा सुरु झाली. अलीकडे, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या अ‍ॅशेसमधील दमदार खेळीमुळे- कोहली विरुद्ध स्मिथचा हा प्रत्येक क्रिकेट प्रेमीचा आवडता मनोरंजनाचा विषय बनला होता. पण, गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर अँटिगा कसोटीच्या पहिल्या दिवशी कोहलीचा सामान्यपणे बाद झाल्याने सोशल मीडियावरील सर्व चाहत्यांनी स्मिथला कोहलीपेक्षा उत्तम टेस्ट क्रिकेटपटू म्हणत भारतीय कर्णधारवर टीकास्त्र सोडले. येथे वाचा काही प्रतिक्रिया:

मी कोहलीचा सर्वात मोठा चाहता आहे पण स्टीव्ह स्मिथ त्याच्यापेक्षा खूप चांगला फलंदाज आहे हे मानले पाहिजे...

कोहली स्मिथ नाही

सेहवाग जी स्टीव्ह स्मिथपेक्षा विराट कोहली चांगले आहे, तुमच्या या टिप्पणीशी सहमत मी नाही.

स्मिथ तुझ्या नंबर 1 क्रमांक मिळवायला येतोय

दम्यान, पहिले फलंदाजी करत टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पण, त्यानंतर केएल राहुल याने अजिंक्य राहणे याच्या साहाय्याने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलही जास्त काळ रहाणेला साथ देऊ शकला नाही आणि 44 धावा करून बाद झाला.