भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात सुरु असलेल्या 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाचा पहिला डाव 297 धावांवर संपुष्टात आला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात 297 धावा करता आल्या. पहिल्या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू स्वस्तात बाद झाले. पण, रहाणेने महत्वपूर्ण सावधपणे फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाच्या 6 बाद 203 धावांवरून पुढे खेळताना टीमला दुसऱ्या दिवशी 297 धावांपर्यंत मजल मारता आली. रिशसभा पंत याने फक्त 4 धावांची भर घालली आणि 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर जडेजाने 58 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने इशांत शर्मा (Ishant Sharma) याने त्याला साथ दिली. इशांत 19 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडीजकडून केमार रोच याने चार तर शेनॉन गॅब्रियल यानं तीन गडी बाद केले. (IND vs WI 1st Test Day 2: जसप्रीत बुमराह याने इतिहास रचला, टीम इंडियासाठी 'ही' कामगिरी करणारा ठरला तिसरा सर्वात वेगवान गोलंदाज)
त्यानंतर गोलंदाजांनीसुद्धा जबरदस्त सुरुवात केली. विंडीजला मोहम्मद शमीने पहिला दणका दिला. शमीने जॉन कॅम्पबेल याला त्रिफळाचित केलं. विंडीजकडून रोस्टन चेज याने सर्वाधिक 48 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर फलंदाज इशांतच्या भेदक माऱ्यासमोर टिकू शकले नाहीत. त्यानंत ईशांत शर्मानं क्रेग ब्रेथवेट याला बाद केलं. त्यानंतर जडेजाने शरमर ब्रूक्स याला बाद करत विंडीजला तिसरा धक्का दिला. त्याच्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह येईन ड्वेन ब्राव्हो याला पायचित केलं. तेव्हा विंडीजची अवस्था 4 बाद 88 अशी झाली होती. टोस्टन चेज याने शाय होप याच्या साथीने डाव सावरला. पण, नंतर इशांतने ही जोडी फोडली. 130 धावांवर चेज बाद झाला. आणि नंतर इशांतने होप, हेटमायर आणि केमार रोच यांनादेखील माघारी पाठवले.
दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची अवस्था 8 बाद 189 धावा अशी होती. याचबरोबर टीम इंडियाकडे अद्याप 108 धावांची आघाडी आहे. भारतासाठी ईशांत शर्मा याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर शमी, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जेसन होल्डर 10 धावांवर, तर मिगुएल कमिन्स त्याच्यासोबत मैदानात होता.