(Photo Credit: @BCCI/Twitter)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध टेस्ट मालिकेतील पहिला सामना पावसामुळं थांबवण्यात आला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी डावाची सुरुवात चांगली केली नाही. विंडीज गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना निरुउत्तर करत फक्त 25 धावांवर 3 विकेट बाद केले. आणि टॉस गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी आली आणि दुपारच्या चहापर्यंत 47.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 134 धावा केल्या. विंडीजने सुरुवातीलाच भारताला तीन मोठे धक्के दिले. मयंक अग्रवाल (Mayank Agrawal), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विंडीज गोलंदाजांसमोर जास्त काळ टिकून राहू शकले नाही. यानंतर सलामीला आलेल्या केएल राहुल (KL Rahul) याने उपकर्णधार अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) याच्या साथीने संयमी खेळीनंतर भारताचा डाव सावरला.

लंचनंतर आलेल्या रहाणे आणि राहुल यांनी पुन्हा सावध सुरुवात केली. राहुल आणि रहाणेने 68 धावांची भागीदारी केली आणि संघाला कठीण परिस्थतीतून बाहेर काढले. पण, राहुलचे अर्धशतक चुकले आणि 44 करत बाद झाला. त्यानंतर, रहाणेने महत्वपूर्ण अर्धशतक केले आणि टीम इंडियाचे शतक पूर्ण करण्यास सहाय्य केले. विंडीजसाठी केमार रोच याने दोन विकेट्स घेतले तर शेनॉन गैब्रिएल आणि रोस्टन चेस यांनी प्रयेकी 1 विकेट घेतली. दरम्यान, पावसामुळे अँटिगामध्ये लवकर चहाचा निर्णय घेण्यात

मयंक आणि राहुल यांनी भारताकडून डावाची सुरुवात झाली. पाचव्या ओव्हरमध्ये रोचने टीम इंडियाला दोन झटके दिले. मयंकला झेल बाद करत रोचने वेस्ट इंडिजला पहिले यश मिळवून दिले. अग्रवाल 5 धावा काढून बाद झाला. पुजारालादेखील झेलबाद करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. पुजारा 2 धावा करून बाद झाला. आठव्या ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहलीही बाद झाला. त्याला रोस्टन चेसने बाद केले आणि भारताला चौथा धक्का दिला.