IND vs WI 1st T20I Likely Playing XI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात आजपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरु होणार आहे. कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स मैदानावर (Eden Gardens) सर्व सामने खेळले जाणार आहेत. यापूर्वी टीम इंडियासाठी (Team India) काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघाची डोकेदुखी वाढली आहे. एकदिवसीय मालिकेत काही खेळाडूंना दुखापत झाली, त्यामुळे ते या मालिकेचा भाग नाहीत. उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि अक्षर पटेल आधीच मालिकेतून बाहेर होते, तर आता वॉशिंग्टन सुंदर याला देखील या मालिकेत खेळता येणार नाही. मात्र, त्यांच्या जागी आणखी काही खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पहिल्या सामन्यात आता राहुलच्या जागी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सलामीला कोणता फलंदाज सलामीला उतरतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ या कॅरेबियन संघावर स्पष्टपणे भारी होता, परंतु टी-20 मध्ये हा संघ कधीही सामन्याचे चित्र बदलू शकतो. पहिल्या टी-20 साम्ण्यासाठी भारताचे संभाव्य 11 खेळाडू खालीलप्रमाणे आहेत. (IND vs WI T20: रोहित शर्माचा खेळाडूंना सल्ला; आता आयपीएल सोडा, देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित करा)
केएल राहुल या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ईशान किशन कर्णधार रोहित सोबत ओपनिंगसाठी येईल. कोरोनामुळे रुतुराज गायकवाड संपूर्ण एकदिवसीय मालिकेतून बाहेर राहिला होता त्यामुळे त्याला यावेळी त्याला संधी मिळते की नाही हे पाहावयास हवे. तर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आणि पाचव्या स्थानावर रिषभ पंतचे स्थान निश्चित आहे. चौथा फलंदाज सूर्यकुमार यादव असू शकतो. विंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवने प्रभावी कामगिरी केली होती. दुसरीकडे, टीम इंडियासाठी सहावा फलंदाज कोण असेल हा मोठा प्रश्न असेल. या पदासाठी भारताकडे दीपक हुडा आणि व्यंकटेश अय्यर असे दावेदार आहेत. हुडाने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या मालिकेत चांगला खेळ दाखवला. अशा परिस्थितीत त्याला टी-20 मालिकेत संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
गोलंदाजीत शार्दूल ठाकूर, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यानंतर भुवनेश्वर कुमारचा नंबर येईल. आणि यानंतर फिरकीपटू म्हणून संघात युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई असे दोन पर्याय आहेत. मात्र चहलकडे भरपूर अनुभव असल्याने तो खेळवण्याची शक्यता अधिक आहे.
भारत संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.