कृणाल पांड्या (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd T20I 2021: श्रीलंका (Sri Lanka) आणि भारत (India) यांच्यात 27 जुलै रोजी होणार दुसरा टी-20 सामना सामना एक दिवस पुढे म्हणजे 28 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. यानंतर मालिकेचा तिसरा व अंतिम टी-20 सामना गुरुवार, 29 रोजी खेळला जाणार आहे. मंगळवारी सकाळी सामन्याआधी रॅपिड अँटिजेन चाचणीनंतर टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) सकारात्मक असल्याचे दिसून आले. वैद्यकीय कार्यसंघांनी आठ सदस्यांना जवळचे संपर्क म्हणून ओळखले आहेत. सध्या भारतीय संघातील सर्व खेळाडू आयोलेशनमध्ये आहेत. या दलात आणखी कोणताही प्रादुर्भाव जाणून घेण्यासाठी संपूर्ण पथक आज आरटी-पीसीआर चाचण्या घेत आहे. या मालिकेचा पहिला सामना भारताने जिंकला होता आणि त्यामुळे त्यांच्याकडे 1-0 अशी आघाडी आहे. (IND vs SL 2021: दुसऱ्या टी-20 पूर्वी श्रीलंका संघाला दुखापतींचा फटका, ‘हे’ तीन खेळाडू निर्णायक सामन्याला मुकण्याची शक्यता)

दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्याबाबत बोलायचे तर क्रुणाल पांड्याने फक्त दोन ओव्हर गोलंदाजी केली आणि 16 रन देत 1 विकेट काढली होती. शिवाय, बॅटिंग करत तो 3 धाव करून नाबाद परतला होता. पहिल्या टी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेला भारतीय संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत धवन ब्रिगेडने 5 विकेट्स गमावून 164 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघ 18.3 ओव्हर 126 धावाच करू शकला. दुसरा सामना आज, मंगळवार रात्री आठ वाजल्यापासून सुरु होणार होता. दुसरीकडे, यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ 3 वनडे आणि 3 टी -20 सामने मालिका खेळण्यासाठी गेला आहे. एकदिवसीय मालिका 13 जुलैपासून सुरू होणार होती. परंतु, श्रीलंका संघातील काही सदस्यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आल्यामुळे मालिकेची सुरुवात 18 जुलैपासून करण्यात आली.

वनडे मालिकेबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने शिखर धवनच्या नेतृत्वात 2-1 असा विजय मिळवला. धवन पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करत आहे तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली होती. मात्र, काट्याच्या सामन्यात अखेरीस यजमान संघाने बाजी मारली व मालिकेत क्लीन स्वीप टाळला.