IND vs SL 2nd ODI 2021: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या भारताविरुद्ध (India) दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंकेच्या (Sri Lanka) तोंडून दीपक चाहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार यांनी विजयाचा घास खेचून काढला. या पराभवानंतर श्रीलंकेचे कोच मिकी ऑर्थर (Mickey Arthur) चांगलेच नाराज दिसले. श्रीलंकन गोलंदाज नियमित अंतराने भारताच्या विकेट काढत असताना ऑर्थरच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते मात्र भारताच्या विजयानंतर त्यांचा चेहराच उतरला. टीम इंडियाच्या (Team India) विजयानंतर आर्थर मैदानात जाऊन श्रीलंकन कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) याच्याशी भिडले. दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 35 व्या ओव्हरपर्यंत गोलंदाजांनी यजमान संघाला सामन्यात वर्चस्व मिळवून दिले होते. मात्र, चाहर आणि भुवनेश्वरच्या संयमी फलंदाजीने त्यांच्या तोंडून विजयाचा घास खेचून आणला. (IND vs SL 2nd ODI: राहुल द्रविडच्या त्या मास्टर स्ट्रोकमुळे झाला भारताचा विजय, भुवनेश्वर कुमारचा मोठा खुलासा)
दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीलंकन प्रशिक्षक ऑर्थर आणि कर्णधार शनाका यांच्यात विवाद होताना दिसत आहे ऑर्थर कर्णधार शनाकाला काहीतरी जाब विचारताना दिसत आहेत मात्र, शनाका त्यांना समजावत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात मालिका बरोबरी करण्याची सर्वात मोठी संधी श्रीलंकेकडे होती परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या खराब कामगिरीने निराशा केली आणि अखेर भारताने याचा फायदा घेत सामन्यासह मालिका खिशात घातली. प्रत्येकी सामन्यात आपल्या खेळ उंचावण्याच्या प्रयत्नात असलेल्या खेळाडूंसाठी हा पराभव पचवणे नक्कीच कठीण असेल, पण त्यांनी कडवी झुंज दिली. सामन्याच्या बऱ्याच भागात दमदार खेळी केल्यानंतरही पराभवामुळे श्रीलंकन खेळाडूंना नक्कीच खेद वाटेल, परंतु भविष्यात फायदा होईल अशी लढाई लढल्यास त्यांना आनंद असेल.
— cric fun (@cric12222) July 20, 2021
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 9 बाद 275 अशी स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात, भारताने पाच चेंडू शिल्लक असताना 7 बाद 277 धावा करत सामना जिंकला. पाचवा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या दीपक चाहरने 82 चेंडू सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 69 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादवनेही भारतासाठी पहिले एकदिवसीय अर्धशतक ठोकले होते. त्याने 44 चेंडूंमध्ये 53 धावांमध्ये 6 चौकारांचा समावेश होता.