भारतीय महिला क्रिकेट संघाच्या (India Women's Cricket Team) कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने बुधवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात नवा इतिहास लिहिला. वनडे मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये कर्णधार म्हणून मैदानात उतरत मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 20 वर्ष पूर्ण केले. इतके वर्ष क्रिकेट खेळणारी मितालीही पहिली महिला क्रिकेटपटू आहे तर, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यानंतर दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. बुधवारी मितालीने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध वनडे सामना खेळताना महिला क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम नोंदविला. मितालीने 26 जून 1999 रोजी भारतासाठी पहिला वनडे सामना खेळला होता. मितालीने 203 वनडे सामन्यांमध्ये 6720 धावा केल्या आहेत. 6 हजार धावा करणारी मिताली ही अजून एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. (IND-W vs SA-W 1st ODI: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने मिळवला सहज विजय)
प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम माजी भारतीय दिग्गज सचिनच्या नावावर आहे. सचिनने 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. सचिनच्या पाठोपाठ श्रीलंकेचा माजी अष्टपैलू सनथ जयसूर्या आहे. जयसूर्याने 21 वर्षे 184 वर्षे आपल्या देशासाठी क्रिकेट खेळला. पाकिस्तानचे जावेद मियांदाद यांनी 20 वर्षे आणि 272 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. दरम्यान, 20 वर्षाच्या कारकिर्दीत मितालीने आजवर 204 वनडे सामने खेळले आहेत.
दरम्यान, आजच्या या ऐतिहासिक मॅचमध्ये भारतीय संघाने निराश केले नाही. आणि आफ्रिकाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये 8 विकेट्सने विजय मिळवला. आजच्या वनडे सामन्यातुन प्रिया पुनियाने आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण केले. तिने 74 धावांची खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. पहिले फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकी संघाला 50 ओव्हरमध्ये 164 धावच करता आल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने 8 गडी राखून विजय मिळवला. मितालीने नाबाद 11 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिक्स जेमिमाह रॉड्रिक्स ने 55 धावांचे योगदान दिले. रॉड्रिक्सने प्रियासह भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली. पुनम राउत ने 16 धावा केल्या.