महेंद्र सिंह धोनी, शाहबाझ नदीम (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) तब्बल 3 महिन्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला. रांचीमध्ये भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील तिसऱ्या आणि अंतिम टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने 3-0 असा विजय मिळवत आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्यांदा क्लीन-स्वीप मिळवला. आणि या खास क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी धोनी खुद्द टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये हाजीर होता. जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक सेमीफायनलनंतर धोनी पहिल्यांदा राष्ट्रीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला. धोनी तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेतून संघात पुनरागमन करेल असे समजले जात आहे. टीम इंडियाने तिसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्यात आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव केला. (IND vs SA 3rd Test 2019: ड्रेसिंग रूममध्ये झोपल्यामुळे रवि शास्त्री झाले ट्रोल; 10 करोड रुपये कमावण्यासाठी सर्वोत्तम Job, यूजर्सने दिल्या प्रतिक्रिया)

यादरम्यान, बीसीसीआयने सोशल मीडियावर धोनी संबंधीचे फोटोज शेअर केले आहे. यात तो, शाहबाझ नदीम आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. धोनी, सामना पाहण्यासाठी ब्लॅक टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पॅन्टमध्ये आला होता. धोनीने रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये हजर राहण्याची अपेक्षा केली होती, परंतु तो काही कारणास्तव पोहोचू शकला नाही. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये धोनी नदीमला खास गुरु मंत्र देताना दिसत आहे. दरम्यान, नदीमने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात धोनीसह झारखंड संघासाठी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 15 वर्ष खेळल्यानंतर नदीमला भारतीय संघात स्थान मिळाले. पहा हे फोटोज:

धोनी आणि रवि शास्त्री 

उल्लेखनीय म्हणजे, भारताने घरच्या मैदानावर सलग अकरावी कसोटी मालिका जिंकली आणि ऑस्ट्रेलियाचा सलग 10 मालिका जिंकण्याचा विक्रम मोडला. याशिवाय, भारतीय फलंदाज- विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल यांनी विक्रमी कामगिरी बजावली. भारताने 497 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी प्रभावी खेळी करत आफ्रिकेचा पहिला डाव 163 धावांत आणि फॉलोऑन देत दुसरा डाव 133 धावांवर संपुष्टात आणला. भारताने तिसरी टेस्ट 202 धावांनी विजय मिळवला.