IND vs SA Series 2022: टीम इंडियाच्या पराभवाचा ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात मोठा खलनायक, पुढच्या सामन्यात होईल पत्ता कट!
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA Series 2022: टीम इंडियाचा (Team India) धाकड खेळाडू जो एकेकाळी संघाची सर्वात मोठी ताकद होता, तो आता भारतीय संघाची (Indian Team) सर्वात मोठी कमजोरी बनला आहे. हा खेळाडू एकेकाळी टीम इंडियासाठी हिरो ठरला होता, पण आता तो अनेक प्रसंगी खलनायक ठरत आहे. गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa Series) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना 211 धावा करूनही टीम इंडियाने सामना गमावला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सर्वात मोठा खलनायक ठरला आहे. या सामन्यात भुवनेश्वरने आपल्या 4 षटकात 43 धावा दिल्या. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 10.80 राहिला. अशा परिस्थितीत या खराब कामगिरीमुळे पुढील सामन्यात भुवनेश्वरचा पुढील सामन्यात पत्ता कट होण्याची चिन्हे दिसत आहे. (IND vs SA 1st T20I: हार्दिक पांड्याच्या ‘त्या’ निर्णयावर गुजरातचे प्रशिक्षक नाराज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या षटकात जाणून घ्या काय केले)

भुवनेश्वर कुमारची कारकीर्द आता संपली असे मानले जात आहे, कारण त्याच्या जागी टीम इंडियाला उमरान मलिकसारखा धोकादायक वेगवान गोलंदाज मिळाला आहे, जो सातत्याने 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीत लक्षणीय घट झाली आहे. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमारचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत ना वेग आहे ना तो आपल्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांमध्ये भीती निर्माण करू शकत आहे. भुवनेश्वरने अनेक देशांच्या फलंदाजांविरुद्ध धुमाकूळ घातला आहे. पण आता संघातील त्याच्या जागेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. भुवनेश्वर कुमार भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला असून त्याने 21 कसोटी सामन्यात 63 विकेट्स, 121 एकदिवसीय सामन्यात 141 बळी आणि 60 टी-20 सामन्यात 59 बळी घेतले आहेत. मात्र, तो गेल्या तीन वर्षांपासून टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर आहे. त्याचवेळी कुमारवर टी-20 विश्वचषक 2021 मधील खराब गोलंदाजीबद्दल टीका झाली होती. आणि आता एकदिवसीय आणि टी-20 संघातूनही त्याचा पत्ता कट होणे निश्चित दिसत आहे.

दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारऐवजी जम्मू-काश्मीरचा उमरान मलिकला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्यास पात्र दिसत आहे. भुवीने आता आपला वेग गमावला आहे, त्याच्याकडे सुरुवातीला अचूकता होती, जिथे तो चेंडू स्विंग करत होता आणि विकेट घेत होता. पण आता कदाचित उमरान मलिकला संधी देण्यात वेळ आली आहे. विश्वचषक 2019 पासून भुवनेश्वरची कारकीर्द दुखापतींमुळे रुळावरून घसरली आहे.