ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अलीकडेच आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे खूप चर्चेत असलेल्या उमरान मलिक (Umran Malik) बद्दल सांगितले की, त्याची गोलंदाजी पाहून त्याला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसची (Waqar Younis) आठवण येते. यावर उमरानने सांगितले की, मी वकार युनूसला कधीही फॉलो केले नाही. उमरानने भारताच्या जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीला आपले आदर्श मानले आहे. जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) शानदार गोलंदाजी केली आणि या जोरावर त्याला दक्षिण आफ्रिके (SouthA Africa Series) विरुद्धच्या भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले. (IND vs SA Series 2022: IPL गाजवणाऱ्या ‘या’ तगड्या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत करतील धमाल)
“मी वकार युनूसला फॉलो केलेले नाही. माझी एक नैसर्गिक क्रिया आहे. माझ्या आदर्शांमध्ये (जसप्रीत) बुमराह, (मोहम्मद) शमी आणि भुवनेश्वर (कुमार) भाई यांचा समावेश आहे. रँकमधून येताना मी खेळत असताना त्यांना फॉलो करायचो,” उमरान म्हणाला. उमरान गेल्या काही वर्षात आयपीएलमध्ये सनरायझर्ससाठी भुवीसोबत खेळला आहे आणि आगामी मालिकेत ड्रेसिंग रूम देखील सामायिक करणार आहे, 22 वर्षीय स्टार गोलंदाजाला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद यांच्यासोबत नजीकच्या काळात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. उमरानचे लक्ष्य भारतासाठी सामना जिंकण्यावर आहेत आणि त्याला आशा आहे की तो एकहाती खेळ करू शकेल आणि जिंकू शकेल. “वाहून जाण्यात काही अर्थ नाही. जर नशिबात असेल तर ते इन्शाअल्लाह होईल. मला माझ्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. मला या पाच (टी-20) सामन्यांमध्ये (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) संधी मिळाली आहे. माझे ध्येय हे असेल की आम्ही पाचही सामने जिंकू, मी चांगली कामगिरी करू आणि भारतासाठी ते सामने एकट्याने जिंकू.”
दरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातून प्रकाश झोतात आलेल्या उमरानने अलीकडच्या हंगामात चांगली कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरानने 14 सामन्यांत 22 विकेट घेतल्या, यामध्ये गुजरातविरुद्ध 25 धावांत 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. उमराननेही 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे. या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांमध्येही त्याचा समावेश झाला असून या संपूर्ण मोसमात उमरानचे क्रिकेटमधील विद्यमान आणि माजी खेळाडूंनी भरभरून कौतुक केले.