मागील आठवड्यापासून सुरु झालेल्या आईसीसी विश्वचषक (ICC World Cup 2019) सामन्यात आज दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाच्या विरोधात टीम इंडियाचे (India) क्रिकेटवीर लढत देत आहेत. क्रिकेट हा धर्म मानला जाणाऱ्या आपल्या देशात विश्वचषकासाठी सामान्य माणसांपासून ते बड्या आसामींपर्यंत सर्वांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील टीम इंडियाला ट्विटर वरून शुभेच्छा दिल्या आहेत. "खेल भी जितो और दिल भी" असं म्हणत मोदींनी प्रोत्साहन देणारे ट्विट केले आहे.
या ट्विटचे वैशिष्ट्य म्हणजे 2004 साली झालेल्या विश्वचषक सामन्यासाठी टीम इंडिया रवाना होत असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील समान आशयाच्या शुभेच्छा सौरव गांगुली यांना दिल्या होत्या. Live Cricket Streaming of India vs South Africa ICC World Cup 2019: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
नरेंद्र मोदी ट्विट
As #TeamIndia begins it’s #CWC19 journey today, best wishes to the entire Team.
May this tournament witness good cricket and celebrate the spirit of sportsmanship.
खेल भी जीतो और दिल भी ! #INDvSA
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2019
आज दुपारी 3 वाजल्यापासून इंग्लंड मधील द रोज बाउल स्टेडियम मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरु आहे, यामध्ये भारताचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह याने सुरवातीच्या षटकांमध्येच आफ्रिकेच्या मातब्बर फलंदाजांना पुन्हा पॅव्हेलियन मध्ये पाठवले आहे. आजचा सामना हा भारताचा पहिलाच सामना असल्याने तर आता पर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन वेळा पराभूत झाला असल्याने यामध्ये विजय मिळवणं दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहे. सध्या टीम इंडियाचा परडा दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारी असल्याचे चित्र समोर येत आहे.