IND vs SA 3rd Test: शाहबाज नदीम याचे धमाकेदार टेस्ट डेब्यू, पहिल्या कसोटी विकेटसह केला 'हा' विक्रम, वाचा सविस्तर
शाहबाज नदीम (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात रांची येथे सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आली आहे. आणि याचे सर्व श्रेय गोलंदाजांना जाते. भरताने 497 धावांवर पहिला डाव घोषित केल्यावर भारतीय गोलंदाजांनी 130 धावांवरआफ्रिकेचे 8 बाद केले. आणि आता सध्या आफ्रिकी फलंदाज फॉलोऑन टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या सत्रात टीम इंडियाकडून पहिली कसोटी खेळणार्‍या शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) याने आपल्या कारकिर्दीतील पहिली टेस्ट विकेट घेतली. दक्षिण आफ्रिका संघ सावरण्याचा प्रयत्न करत असताना रवींद्र जडेजा याने झुबैर हमजा याला बाद करत टेंबा बावुमा (Temba Bavuma) आणि हमझाची 91 धावांची भागीदारी मोडली. याच्या पुढच्याच षटकात नदीमने संधीचा फायदा उठवत रिद्धिमान साहा यांच्याकडे बावुमाला 32 धावांवर झेल देऊन कारकिर्दीतील पहिला कसोटी विकेट घेतली. (IND vs SA 3rd Test Day 3 Live Score Updates: वेळेपूर्वी घ्यावा लागला Tea ब्रेक)

नदीम, स्टंपिंगद्वारे कारकिर्दीतील प्रथम विकेट घेणाऱ्या निवडक गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला. ही कामगिरी करणारा नदीम चौथा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी डब्ल्यू वीरन, एम वेंकटरमन आणि आशिष कपूर यांनी स्टंप आऊट करत त्याच्या कारकिर्दीतील पहिले विकेट घेतली होती. कुलदीप यादव याच्या दुखापतीनंतर नदीमला टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. दरम्यान, नदीमने आफ्रिकेच्या 2 विकेट घेतल्या.

पहिल्या डावात फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्या. यात रोहित शर्मा याने 212, अजिंक्य रहाणे याने 115, रवींद्र जडेजा याने 51 आणि उमेश यादव ने 31 धावांचे योगदान दिले. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी 39 धावांवर 3 विकेट गमावल्या. पण, नंतर रोहित आणि रहाणेच्या जोडीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.