भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांची कसोटीच्या तिसर्या दिवसाचा खेळ संपला. हा सामना जिंकण्यापासून भारत फक्त 2 विकेट दूर आहे. यंदाच्या मालिकेत आफ्रिकेला दुसऱ्यांदा फॉलोऑन देत भारतीय गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखून ठेवले. फॉलोऑन देत मोहम्मद शमीने 3, उमेश यादवने 2 तर, रवींद्र जडेजा आणि अश्विन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
SA 132/8 in 45 Overs | IND vs SA 3rd Test Day 3 Live Score Updates: भारताला विजयासाठी 2 विकेटची गरज, तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 132/8
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये आज तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होत आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चौथ्या क्रमांकावरील अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या द्विशतकी भागीदारीमुले भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला. भारताने पहिला डाव दुसऱ्या दिवशी टी वेळेनंतर घोषित केला. याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने, खराब प्रकाशामुळे खेळ थांबण्याआधी 9 धावांवर 2 विकेट गमावले होते. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला. आफ्रिकेचा सलामी फलंदाज डीन एल्गार आणि क्विंटन डी कॉक स्वस्तात माघारी परतले. भारताकडून मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांनी आफ्रिकेला सुरुवातीचे धक्के दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार फाफ डू प्लेसिस एक धाव घेऊन, तर झुबैर हमजा अद्याप खाते न उघडता खेळत आहेत. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे गोलंदाज आफ्रिकी फलंदाजांवर दबाव बनवून ठेवण्याचा प्रयत्न करतील.
दरम्यान, तिसऱ्या टेस्टमध्ये भारताकडून रोहितने दुहेरी शतक झळकावले तर रहाणेनेही शतकी खेळी करुन संघाच्या मोठ्या धावांमध्ये मोलाचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट जॉर्ज लिंडे याने घेतले. लिंडेने भारताचे 4 गडी बाद केले. कगिसो रबाडा याने एक, तर एनरिच नॉर्टजे आणि डॅन पीट यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. भारताच्या शेवटच्या काही ओव्हरमध्ये उमेशने महत्वपूर्ण केल्ली केली. उमेशने लिंडेच्या एका ओव्हरमध्ये 5 षटकार लागले आणि 10 चेंडूत 31 धावा केल्या. यात उमेशने 30 धावा षटकार मारत केल्या तर एक सिंगल धाव घेतली.