विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

टीम इंडियाची रन मशीन विराट कोहली (Virat Kohli) याने दमदार फलंदाजीसह 10 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले आहे. विराटने पुण्यात शानदार फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतीलआपले 26 वे शतक पूर्ण केले. या शतकाच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याची बरोबरी केली. दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत कोहलीने 183 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात कोहलीने उत्कृष्ट शतक झळकावले. पहिल्या दिवशी विराट 63 धावांवर नाबाद परतला आणि दुसर्‍या दिवशी त्याने डावाची प्रगती करत 173 व्या चेंडूवर शतक पूर्ण केले. (IND vs SA 2nd Test Day 2: 26 वे टेस्ट शतक करत विराट कोहली ने केली स्टिव्ह स्मिथ, रिकी पॉन्टिंग यांची बरोबरी)

आता या शतकानंतर विराटला इंग्लंडने माजी क्रिकेटपटू सर लिओनार्ड हटन, श्रीलंकेचे सनथ जयसूर्या, आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ यासारख्या अन्य दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकण्याची संधी आहे. विराटने टेस्टमध्ये 6925 पेक्षा अधिक धावा केल्या आहे. आणि त्याच्यापुढे हटन (6971), जयसूर्या (6973) आणि स्मिथ (6973) आहे. यंदा आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या मॅचमध्ये विराटला या खेळाडूंना टेस्ट धावांच्याबाबतीत मागे टाकण्याची संधी आहे.

दरम्यान, अर्धशतकाचे शतकात रुपांतर करण्याच्या बाबतीत कोहलीने सर्व फलंदाजांना मागे ठेवले आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या अगदी मागे आहे. अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्याच्या बाबतीत कोहलीचा रेट 53.1 आहे, तर डॉन ब्रॅडमनची सरासरी 69 आहे. त्याच्याशिवाय माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची सरासरी 51.2 आहे. अझरचा रेट जास्त जास्त असला तरीही कोहलीने त्याच्यापेक्षा जास्त शतके ठोकली आहेत.