IND vs SA 2nd Test Day 2: 26 वे टेस्ट शतक करत विराट कोहली ने केली स्टिव्ह स्मिथ, रिकी पॉन्टिंग यांची बरोबरी
विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात दमदार शतक केले आहे. विराटच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 26 टेस्ट शतक आहे. विराटने 174 चेंडूत शतक पूर्ण केले. या शतकी खेळीसह विराटने ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टिव स्मिथ (Steve Smith) आणि रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांच्या टेस्ट शतकांची बरोबरी केली आहे. स्मिथने यंदाचं इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत 3 शतक केले आणि शंकांची संख्या 26 वर नेली. विशेष म्हणजे, मागील वर्षी डिसेंबरमध्ये पर्थ क्रिकेट स्टेडियम मध्ये अंतिम टेस्ट शतक केले होते. त्यानंतर, आफ्रिकाविरुद्ध तिसरे तर यंदाच्या वर्षातील पहिले टेस्ट शतक आहे.  आतापर्यंतचे वर्ष कर्णधार म्हणून कोहलीसाठी वर्ष चांगले राहिले आहे, परंतु फलंदाज म्हणून तो सरासरी खेळाडू दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वी आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहली क्रमांकाचा पहिला फलंदाज होता, पण त्याची दुसर्‍या स्थानावर घसरण झाली. (IND vs SA 2nd Test Day 2: विराट कोहली ने दिलीप वेंगसरकर यांना टाकले मागे, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध शतकाच्या जवळ)

विश्वचषकनंतर विराट आणि संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेस्ट मालिका खेळली होती, पण यात विराटला शतक करता आले नव्हते. मागील दहा महिन्यांत विराटने एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत आणि यात त्याची सर्वाधिक धावा 82 धावा होती. शिवाय, विराटचे हे कर्णधार म्हणून 19 वे शतक आहे आणि याच्याबरोबर त्याने माजी ऑस्ट्रेलियाई कर्णधार पॉन्टिंग याचीदेखील बरोबरी केली. पॉन्टिंगने देखील कर्णधार म्हणून 19 शतक केले आहेत. तर, माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधार ग्रीम स्मिथ याने कर्णधार म्हणून सर्वाधिक 25 टेस्ट शतक केले आहेत.

दरम्यान, सध्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया एक मोठ्या स्कोरकडे अग्रेसर आहे. कोहलीने अजिंक्य रहाणे याच्यासह शतकी भागीदारी केली आणि संघाला तिहेरी शतक करण्यास सहाय्य केले. यापूर्वी, आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये भारताने 203 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.