IND vs SA 2nd Test Day 3: जसप्रीत बुमराह-Marco Jansen यांच्यात झाला राडा, वांडरर्सवर भारत-दक्षिण आफ्रिका खेळाडू भिडले, असे शांत झाले प्रकरण (Watch Video)
मार्को जॅन्सन आणि जसप्रीत बुमराह एकमेकांना भिडले (Photo Credit: Twitter)

IND vs SA 2nd Test Day 3: भारत (India) आणि यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून यजमान संघाचे वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांवर पूर्णपणे ताबा मिळवला. अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने तीन विकेट घेत यामध्ये मुख्य भूमिका बजवली. यानंतर दुसऱ्या सत्रात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये गरमागरमीचे चित्र पाहायला मिळाले. भारताविरुद्ध कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन (Marco Jansen) आणि भारताचा स्टार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भर मैदानातच एकमेकांना भिडले. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने गोलंदाजी आक्रमणासह शाब्दिक आक्रमणंही केली. मात्र पंचांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या दिशेने गेले. (IND vs SA 2nd Test Day 3: टीम इंडियाचा दुसरा डाव 266 धावांत संपुष्टात, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिले 240 धावांचे लक्ष्य)

महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या जसप्रीत बुमराहने स्वतःवरील ताबा गमावला. बुमराहचा मुंबई इंडियन्स सहकारी जॅन्सन शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीचे झटपट विकेट घेतल्यानंतर भारताचा डाव संपवण्याच्या घाईत दिसला आणि बुमराहवर बाउन्सरने मारा केला. त्यापैकी एक शॉर्ट बॉल बुमराहच्या हातावर लागला आणि जॅन्सनने त्याला टक लावून पाहिलं पण भारताच्या वेगवान गोलंदाजाने त्याला इशारा केला की या फटक्याची त्याला दुखापत झाली नाही. पुढच्या चेंडूवर बुमराहने दुसर्‍या बाऊन्सर खेळला परंतु यावेळी जॅन्सन आणि बुमराहमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले ज्यामुळे गोष्टी अधिक तापल्या. बुमराह क्रीजमधून बाहेर पडला आणि गोलंदाजाकडे गेला. तथापि अंपायर मराइस इरास्मसने दोघांकडे धाव घेतील आणि प्रकरण शांत केले.

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ सध्या आघाडीवर दिसत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान संघाला 229 धावांत गुंडाळल्यावर टीम इंडियाने आतापर्यंत 59 षटकांत 253/9 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वागला अन्य धुरंधर फलंदाज अर्धशतकी पल्ला सर करू शकले नाही. रहाणेने सर्वाधिक 58 धावा केल्या तर पुजाराने 53 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवसाखेर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाल्यावर दोंघांनी शतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला.