IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 202 डावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी यजमान संघाने 167 धावांच्या पिछाडीसह पुढे खेळण्यास सुरुवात केली. या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या ऐवजी सलामीवीर केएल राहुलच्या हाती संघाची कमान देण्यात आली आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू आकाश चोप्राने (Aakash Chopra) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अनेक विकेट पडू शकतात, असे चोप्रा यांनी म्हटले आहे. (IND vs SA 2nd Test Day 1: पहिल्या दिवसावर दक्षिण आफ्रिकेची पकड, दिवसाखेर Proteas संघ टीम इंडियाच्या आणखी 167 धावांनी पिछाडीवर)
चोप्रा म्हणाले की, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सात किंवा अधिक विकेट पडतील. सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करणे थोडे कठीण असते, पण सेंच्युरियनमध्येही चांगली फलंदाजी केली तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी, असे चित्र सेंच्युरियनमध्ये पाहायला मिळाले होते. कारण शेवटच्या डावात धावांचा पाठलाग होत नाही. विकेट बदलते. या खेळपट्टीवर फिरकीपटू अजिबात विकेट घेऊ शकणार नाहीत आणि फक्त वेगवान गोलंदाजच संघाला सामन्यात विजय मिळवून देऊ शकतात. दरम्यान वांडरर्स स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 40 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी दोन्ही संघाने बरोबरीने वर्चस्व गाजवले आहेत. टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत 15 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 15 मॅचमध्ये पराभव केला आहे. याशिवाय दोन्ही संघांचे 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
India scored 202 on day 1, thanks to another good innings from KL Rahul. Where is this match headed from here? What will be my predictions for 2nd day?
Checkout Betway here: https://t.co/Ax7aEuKlvU pic.twitter.com/xQE801JilP
— Aakash Chopra (@cricketaakash) January 4, 2022
याशिवाय जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी आहे. या मैदानावर टीम इंडिया आजपर्यंत एकही कसोटी हरलेली नाही. टीम इंडियाने वाँडरर्समध्ये आतापर्यंत एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 जिंकले आहेत तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य ठरली आहे. त्यामुळे या मैदानावर टीम इंडिया आपली विजयी घोडदौड सुरु ठेऊ शकते की नाही याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असेल.