IND vs SA 2nd Test Day 2: विराट कोहली याचे रेकॉर्ड दुहेरी शतक, दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेवर 565 धावांची आघाडी
(Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताने 601 धावा करून पहिला डाव घोषित केला. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने नाबाद 254 धावा केल्या तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja( 91 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवशी मयंक अग्रवाल याने 108 धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 3 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 565 धावांची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या सुरुवातीला पहिली विकेट एडन मार्क्राम (Aiden Markram) याच्या रूपात पडली.मार्क्राम एकही धाव करू शकला नाही आणि उमेश यादव (Umesh Yadav)  याच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू बाद झाला. दरम्यान, काही वेळानंतर उमेशनेच भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने मागील सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या डीन एल्गर याला 6 धावां बाद करून दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत थेयूनिस डी ब्रूयन आठ आणि एनरिक नॉर्ट्जे (Anrich Nortje) दोन धावा करत खेळत आहेत. (IND vs SA 2nd Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टेस्टदरम्यान विराट कोहली सह या खेळाडूंनी बनवले 'हे' प्रमुख रेकॉर्ड, वाचा सविस्तर)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेत टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयंकच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावून 273 धावा केल्या होत्या. या डावात मयंकने 16 चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसऱ्या दिवशी या सामन्यात कोहलीने दुहेरी शतक ठोकून इतिहास रचला. त्याने 295 व्या चेंडूत 28 चौकारांच्या मदतीने दुहेरी शतक पूर्ण केले. कोहली भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक दुहेरी शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. शिवाय, कोहलीने कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांची नोंद केली. दुसऱ्या दिवशी लंचनंतर अजिंक्य रहाणे 59 धावा करुन केशव महाराज याचा शिकार बनला. कसोटी क्रिकेटमधील ही महाराजांची 100 वी विकेट होती. कोहली आणि रहाणे यांनी 178 धावांची भागीदारी केली. संघाचा उपकर्णधार रहाणेने कसोटी कारकीर्दीचे 20 वे अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने 141 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.

त्यानंतर, कोहलीने रवींद्र जडेजाच्या साथीने द्विशतकी भागीदारी केली आणि संघाने 600 धावांचा टप्पा गाठला. भारताकडून उमेश यादवने दोन आणि मोहम्मद शमी याने एक गडी बाद केला.