IND vs SA 2nd Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टेस्टदरम्यान विराट कोहली सह या खेळाडूंनी बनवले 'हे' प्रमुख रेकॉर्ड, वाचा सविस्तर
(Photo Credit: IANS)

शुक्रवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी पाच बाद  601 धावांवर भारताने डाव घोषित केला. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 254 धावांवर नाबाद राहिला तर अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 91 धावा केल्या. पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात विराटने आपल्या कारकिर्दीतील 7 वे द्विशतक झळकावले. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला, पण या खेरीज विराटने ऑस्ट्रेलियाच्या महान सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) च्या विक्रमासह अनेक विक्रमही मोडले. या सामन्यात विराटने 297 चेंडूत आपले विक्रम डबल शतक पूर्ण केले. पण, एकट्या कोहलीनेच नाही तर अन्य काही खेळाडूंनी देखील विक्रमांना गवसणी घातली. विराटशिवाय सलामीला आलेल्या मयंक अग्रवाल याने शतकी खेळी केली होती. तर अजिंक्य रहाणे अर्धशतक करून माघारी परतला. (IND vs SA 2nd Test Day 2: विराट कोहली याच्यासमोर आफ्रिकी गोलंदाज निरुत्तर, टीम इंडियाने पहिला डाव 601/5 धावांवर केला घोषित)

इथे आपण पाहूया आजच्या दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिकी खेळाडूंनी 'या' विक्रमांना गवसणी घातली.

1. टेस्टमध्ये 150 किंवा अधिक सर्वाधिक धावा

विराट कोहली याने या डावा दरम्यान आपले 150 धावा पूर्ण केले तेव्हा त्याने ब्रॅडमन यांना मागे सोडले. या खेळीसह विराट कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक दीडशे किंवा त्याहून अधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. विराटचा हा 150 पेक्षा जास्त धावांचा 9 वा डाव होता. तर ब्रॅडमनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून असे 8 डाव खेळले आहेत. यानंतर विराटने त्याच्या 150 धावांचे दुहेरी शतकात रूपांतर केले.

2. कर्णधार म्हणून विराटचे 7 वे दुहेरी शतक 

आफ्रिकाविरुद्ध तुफानी फलंदाजी करत विराटने टेस्ट करिअरमधील ७ वे दुहेरी शतक केले. विराटने केलेले सर्व दुहेरी शतकं त्याने कर्णधार म्हणून केली आहेत. यासह त्याने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याला मागे सारत कर्णधार म्हणून सर्वाधिक दुहेरी शतक करण्याचा रेकॉर्ड केला. विराटने कर्णधार म्हणून ७ शतकं केली आहेत, तर लारा ५ दुहेरी शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, डॉन ब्रॅडमन यांनी सर्वाधिक 12 दुहेरी शतकं केली आहेत.

3 टेस्टमधील 7,000 धावा 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या असे कोणताही विक्रम नाही ज्याला विराटने आपल्या नावावर नाही केले. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टदरम्यान विराटने डॉन ब्रॅडमन यांच्याही विक्रमला गवसणी घातली आहे. टेस्टमध्ये 7वे दुहेरी शतक करत विराटने टेस्टमध्ये 7,000 धावांचा टप्पा ओलांडला. यासह त्याने, माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इंग्लंडचे सर लिओनार्ड हटन, श्रीलंकेचे सनथ जयसूर्या, इंग्लंडचा टेस्ट कर्णधार जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि ब्रॅडमन यांना पिछाडीवर टाकले. आजवर विराटने टेस्टमध्ये 7054 धावा केल्या आहेत.

4. 7 दुहेरी शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज 

आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात केलेले विराटचे दुहेरी शतक हे त्याच्या करिअरमधील 7वे होते. यासह विराटने भारतासाठी सर्वाधिक दुहेरी शतक करण्याच्या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी, माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी ६-६ दुहेरी टेस्ट शतकं केली होती.

5. केशव महाराज 100 टेस्ट विकेट्स 

भारताविरुद्ध दुसरा टेस्ट मॅचमध्ये केशव महाराज याने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. केशव हा आफ्रिकेसाठी 100 टेस्ट विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. आफ्रिकासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज फिरकीपटू पॉल अडॅम्स आहेत. त्यांनी कारकिर्दीत 134 विकेट्स घेतल्या आहेत. आणि यासह आता केशवने माजी आफ्रिकी दिग्गज निकी बोए यांची बरोबरी केली. निकी बोएने देखील 100 टेस्ट विकेट्स घेतल्या होत्या.

6 कर्णधार म्हणून 19 वे टेस्ट शतक 

26 वे टेस्ट शतक करत विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया माजी विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंग याची बरोबरी केली. पॉन्टिंग आणि विराटने कर्णधार म्हणून 19 टेस्ट शतकं केली आहेत.

7 स्टिव्ह स्मिथ याची केली बरोबरीभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात दमदार शतक केले आहे. विराटच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 26 टेस्ट शतक आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टिव स्मिथ (Steve Smith) याच्या टेस्ट शतकांची बरोबरी केली आहे. स्मिथने आजवर टेस्टमध्ये 26 शतक केले आहेत.

7. 250 किंवा अधिक धावा करणारा पाचवा भारतीय

भारतासाठी टेस्टमध्ये 250 किंवा अधिक धावा करणारा विराट हा पाचवा फलंदाज आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग पहिल्या स्थानावर आहे, त्याच्या मागे करून नायर, व्हीव्हीस लक्ष्मण, आणि राहुल द्रविड आहे. सेहवागने तीन वेळा (319, 309, 293, 254) 250 किंवा अधिक धावा केल्या आहेत. नायर, लक्ष्मण आणि द्रविड यांनी प्रत्येकी 1-1 वेळा ही कामगिरी केली आहे. विराटने देखील पहिल्यांदा 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

8. टेस्ट करिअरमधील विराटचा सर्वाधिक स्कोर

पुणे कसोटी सामन्यात विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट धावा केल्या. पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने नाबाद 254 धावा ठोकल्या आणि ही त्याच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकीर्दीतील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.

9. सर्वात जलद 21,000 आंतरराष्ट्रीय धावा

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेगवान 21000 धावांच्या पुढे जाण्यासाठी 281 धावांची आवश्यकता होती. पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही धावसंख्या गाठली आणि चमत्कार करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.

वेगवान आंतरराष्ट्रीय 21,000 धावा (सामन्यांची संख्या)

392 सामने - विराट कोहली

396 सामने - ब्रायन लारा

418 सामना - सचिन तेंडुलकर