शार्दुल ठाकूर आणि रबाडाने ओव्हरस्टेप केले (Photo Credit: Instagram, Twitter)

IND vs SA 1st Test Day 4: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. पाहुण्या संघाने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) रूपात पहिली विकेट गमावली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर नाईटवॉचमन म्हणून ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. शार्दुलची भूमिका दिवसातील शेवटचे काही उरलेले चेंडू खेळून काढण्याची होती आणि त्याने नाबाद राहून चांगली कामगिरी केली परंतु चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही क्षणांत शार्दुल 10 धावांवर कगिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाल्यानंतर वाद सुरू झाला, ज्यामध्ये रबाडा गोलंदाजीच्या लाईनच्या पुढे जाता दिसत आहे आणि ज्या चेंडूवर शार्दुल आऊट झाला तो नो-बॉल होता अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. (IND vs SA 1st Test Day 4: टीम इंडिया दुसऱ्या डावात 174 धावसंख्येवर गारद, दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे विशाल आव्हान)

अशा स्थितीत शार्दुल ठाकूर रबाडाच्या नो बॉलवर बाद झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या फोटोवरून चाहते सोशल मीडियावर थर्ड अंपायरला ट्रोल करत आहेत. रबाडाचा चेंडू ठाकूरच्या बॅटच्या बाहेरील बाजूला लागला आणि तो दुसऱ्या स्लिपमध्ये बाद झाला. तथापि व्हायरल फोटो दाखवत आहे की थर्ड अंपायर नो-बॉल स्पॉट करू शकला नाही. शार्दुल बाद झाल्यानंतर एका चाहत्याने ट्विट केले की, ‘उत्तम अंपायरिंग. शार्दुल ठाकूरची विकेट.’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘अर्ड अंपायर कुठे झोपले आहेत? ठाकूर नो बॉलवर आऊट झाला.’

उत्तम अंपायरिंग...

थर्ड अंपायर कुठे झोपला आहे?

रबाडाने सातत्याने ओव्हरस्टेड केले आहे...

सामन्याबद्दल बोलायचे तर सामन्यात पुनरागमन करताना, दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी भारताला दुसऱ्या डावात 174 धावात गुंडाळले. आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला आता जिंकण्यासाठी 305 धावांची गरज आहे. दरम्यान आतापर्यंत 23 षटकांचा खेळ झाला असून यजमान संघाने दोन विकेट गमावल्या असून धावा केल्या आहेत. अशाप्रकारे त्यांना आता विजयासाठी आणखी धावांची गरज आहे तर टीम इंडिया विजयापासून आठ विकेट दूर आहे. अशा परिस्थितीत आता पाचव्या आणि अखेरच्या दिवशी दोन्ही संघात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.