IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रिद्धिमान साहा करणार विकेटकीपिंग, पहिल्या टेस्टमध्ये रिषभ पंत टीम इंडियातुन याला वगळले
रिद्धिमान साहा (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेला उद्या, २ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत विकेटकीपिंग कोण असणार याची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या कसोटी मॅचच्या एक दिवस आधी, कोहलीने मालिकेत रिषभ पंत (Rishabh Pant) नाही  विकेटकीपिंग करणार नसल्याची पुष्टी केली आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या एक दिवसाआधी कोहलीने सांगितले आहे की, या कसोटी मालिकेत रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) एक विकेटकीपर म्हणून भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. साहा तब्बल 22 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टेस्ट मालिका खेळेल. साहाने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरची टेस्ट मालिका खेळली होती. यानंतर दुखापत झाल्याने त्याची पुढील मालिकेसाठी संघात निवड झाली नाही. (IND vs SA 1st Test: पहिल्या टेस्ट मॅचवर पावसाचे सावट, विशाखापट्टणममध्ये पाचही दिवस असणार असे हवामान)

पंतवर त्याच्या खराब कामगिरीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पंतचा मालिकेचा भाग असेल पण आता तो संघात एक तज्ज्ञ फलंदाज म्हणून खेळेल. कोहलीने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, “रिद्धिमान साहा या कसोटी मालिकेत आमच्यासाठी विकेटकिपिंग करेल." दरम्यान, मालिकेपूर्वी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रोहित शर्मा याच्या फलंदाजीची स्थिती. कसोटीत सलामीवीर म्हणून शर्माला टेस्ट करण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन उत्सुक आहे. यावर कोहली म्हणाला की, रोहितला या स्थानावर रोहितला पूर्ण संधी दिली जाईल. याशिवाय, विराटने पहिल्या टेस्टसाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याची प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याचीदेखील पुष्टी केली. अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. विराट म्हणाला की 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात भारत 2 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल. यात अश्विनशिवाय रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचादेखील समावेश असेल.

पंत सध्या त्याच्या फॉर्मशी संघर्ष करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत 21 वर्षीय पंतने दोन सामन्यात 58 धावा केल्या होत्या. शिवाय, त्याची विकेटकिपिंग शैलीने देखील सर्वांना निराश केले. एमएस धोनी याने विंडीज आणि नंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेतून माघार घेतल्यावर पंत विकेटकीपर म्हणून निवड समितीची पहिली पसंत होता. विंडीजविरुद्ध देखील पंतला प्राधान्य देत साहाला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पंतच्या घसरत्या फॉर्ममुळे त्याला संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याचे समजले जात आहे.

असा आहे टीम इंडियाचा प्लेयिंग इलेव्हन संघ: 

रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.