IND vs SA 1st Test: टेस्ट में बेस्ट टीम इंडिया! सेंच्युरियन कसोटी जिंकून ‘विराटसेना’ ठरली 2021 ची सर्वात यशस्वी टीम, यावर्षी ‘इतक्या’ सामन्यात राहिली अजेय
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ (Indian Team) 2021 मध्ये आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. या प्रकरणात पाकिस्तान (Pakistan) संघालाही मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात यजमानांचा पराभव करून भारताने हा टप्पा गाठला आहे. सेंच्युरीयनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) 113 धावांनी जबरदस्त मिळवला. यश भारतीय संघाने मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या सेंच्युरियन विजयात मोहम्मद शमीसह गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. सेंच्युरियन टेस्ट सामना जिंकून भारतीय संघ यावर्षी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारी टीम ठरली आहे. याप्रकरणात भारताने पाकिस्तान संघाला पछाडलं आहे. (IND vs SA 1st Test: ‘विराटसेने’ने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर मात करून सेंच्युरियनवर टीम इंडियाचा पहिला विजय; कोहलीच्या नेतृत्वात केली मोठी कमाल!)

टीम इंडियाने वर्ष 2021 मध्ये एकूण 14 कसोटी सामने खेळले. यापैकी 8 सामने त्यांनी जिंकले असून 3 सामन्यात पराभव झाला आणि तितकेच सामने अनिर्णित राहिले. यादरम्यान त्यांनी विजयी टक्केवारी 57.14 असून पाकिस्तानची टक्केवारी सर्वाधिक 77.77 अशी राहिली. न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामना जिंकून यापूर्वी टीम इंडियाने 7 सामने जिंकून पाकिस्तानशी बरोबरी साधली होती. मात्र सुपरस्पोर्ट कसोटीत विजयाची नोंद करत भारताने पाकिस्तानला मागे टाकले. 2021 मध्ये भारताने आतापर्यंत 8 कसोटी सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 7 सामने आणि इंग्लंड चार कसोटी सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. उल्लेखनीय आहे की इंग्लंड कसोटी संघासाठी हे वर्ष अतिशय खराब ठरले. 2021 मध्ये त्यांनी एकूण 9 कसोटी सामने गमावले आहेत. एका वर्षात सर्वाधिक कसोटी सामने गमावण्याच्या बाबतीत त्यांनी बांगलादेशची बरोबरी केली आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याबद्दल बोलायचे तर सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 191 धावांत गुंडाळले. कर्णधार डीन एल्गरने दुसऱ्या डावात 77 धावा केल्या. विशेष म्हणजे सेंच्युरियनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकून भारताने इतिहास घडवला. दोन्ही संघातील पुढील सामना आता 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला जाईल.