
IND vs SA 1st Centurion Test: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) कसोटी मालिकेत टीम इंडियाने (Team India) चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजी करून 3 बाद 272 धावा केल्या होत्या. सलामीवीर फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) शानदार 122 धावा केल्या आणि तो क्रीजवर नाबाद खेळत आहे. मात्र यादरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ मात्र पावसाने खराब केला. पावसामुळे सोमवारी एकही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. सकाळपासून पाऊस पडत होता. त्यामुळे आता सामन्यात फक्त तीन दिवसाचा खेळ शिल्लक राहिला आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतांना मोठा धक्का बसू शकतो. उल्लेखनीय आहे की टीम इंडिया आतापर्यंत कधीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेली नाही. (IND vs SA 1st Test : सेंच्युरियनमध्ये दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया, तिसर्या दिवशी कसे असेल हवामान? जाणून घ्या)
सेंचुरियनच्या हवामान अंदाजानुसार मंगळवारी आकाश साफ राहण्याची शक्यता असून पाऊस पडणार नाही. मात्र चौथ्या आणि पाचव्या दोन्ही दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परीस्थितीत चांगल्या सुरुवातीनंतर विजयाची आशा बाळगणाऱ्या विराट कोहलीचाय टीम इंडियावर हवामान बदलाचे चित्र दिसत आहे. टीम इंडिया आता तिसऱ्या दिवशी वेगवान फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला लवकरात लवकर फलंदाजीसाठी बोलावण्याचा निर्धारित असेल. संघात 4 वेगवान गोलंदाज आहेत ज्याचा फायदा घेऊन ते यजमान संघाच्या धावसंख्येवर ब्रेक लावू शकतात. मात्र पावसाने सामन्यात अडथळा आणल्यास चांगली सुरुवात करूनही टीम इंडियाचे सामना जिंकण्याचे स्वप्न भंग होऊ शकते.
सेंच्युरियनच्या सामन्याबद्दल बोलायचे तर केएल राहुल, मयंक अग्रवाल यांच्यानंतर अजिंक्य रहाणेने शानदार फलंदाजी करत यजमान संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. आता उरलेल्या संधीचा फायदा भारतीय गोलंदाजांना घ्यावा लागणार आहे. गेल्या काही सामन्यात खराब कामगिरीनंतरही टीम इंडियाने चेतेश्वर पुजार आणि रहाणेला संधी दिली. मात्र, पुजारा पहिल्या डावात संधीचा फायदा करून घेण्यात अपयशी ठरला आणि शून्यावर बाद झाला. मात्र रहाणेने नाबाद 40 धावा करून जिन्क खेळत असून त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.