(Photo Credit: AP/PTI)

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या टेस्टच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी आपले वर्चस्व बनवून ठेवले आहे. दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने 1 विकेट गमावली होती. पण, पाचव्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताला (India) पहिला टेस्ट सामना जिंकण्यासाठी 2 विकेट्सची गरज आहे. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली आणि आफ्रिकी फलंदाजांना मोठा खेळ करण्याची संधी दिली नाही. दुसर्‍या डावात सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या रेकॉर्ड शतकी खेळीमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 395 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. पाचव्या दिवशी रविचंद्रन अश्विन (R Ashwin) , मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी आफ्रिकी फलंदाजांना मुश्किलीत पडले. (IND vs SA 1st Test Day 5: रविचंद्रन अश्विन याचा कमाल; मुथय्या मुरलीधरन ची बरोबरी करत बनवला सर्वात जलद 350 टेस्ट विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड)

चौथ्या दिवसअखेर भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे अशक्य लक्ष्य दिले होते. आणि त्यामुळे, पाचव्या दिवसाचा खेळ थरारक झाला. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होताच रविचंद्रन अश्विन याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. अश्विनने थेउनिस डी ब्रुयन याची विकेट घेली. डी ब्रुयनची विकेट अश्विनच्या टेस्ट कारकिर्दीतील 350 वी विकेट होती. यासह त्याने मुथय्या मुरलीधरन यांची बरोबरी केली. अश्विन आणि मुरलीधरनने सर्वात जलद 66 डावात 350 टेस्ट विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. तर भारतासाठी सर्वात जलद 350 टेस्ट विकेटदेखील अश्विनने घेतल्या. त्यानंतर, मोहम्मद शमी ने विकेट घेण्याची सुरुवात केली. शमीने टेंबा बावुमा, कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि नंतर क्विंटन डी कॉक यांना स्वस्तात बाद करत संघाचा विजय निश्चित केला.

दरम्यान, भारताने पहिला डाव 502 धावांवर घोषित केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकी संघाला 431 धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियासाठी सलामीची जोडी-मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक स्कोर केला तर आफ्रिकासाठी डीन एल्गार,फाफ डु प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक यांनी सर्वाधिक स्कोर केला. आफ्रिकी दुसरीकडे आफ्रिकी गोलंदाज काही खास प्रभाव पडू शकले नाही. फिरकी गोलंदाजांना उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर केशव महाराज आणि डेन पीट यांनी प्रत्येकी अनुक्रमे 5 आणि 1 विकेट घेतली.