IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियन टेस्टच्या पहिल्या डावात टीम इंडिया करणार इतक्या धावा, माजी सलामीवीरने दुसऱ्या दिवसापूर्वी केली मोठी भविष्यवाणी
अजिंक्य रहाणे (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 1st Test Day 2: केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांच्या शानदार खेळीमुळे सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) पहिल्या दिवशी टीम इंडियाचा (Team India) दबदबा राहिला. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीरांनी 117 धावांची भागीदारी करून पाहुण्या संघाला जोरदार सुरुवात करून दिली. आता भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने (Aakash Chopra) म्हटले आहे की पहिल्या डावात भारताला एकूण किती धावा करतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाले, “मला वाटते की भारत 350 हून अधिक धावा करेल. शाब्बास, हे अभूतपूर्व आहे.” भारतीय टीमने पहिल्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या डावात 3 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या, आता त्यांना दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या गाठण्याची मोठी संधी आहे. (IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियनमध्ये दिवसाचे पहिले सत्र पावसाच्या पाण्यात, तीन वाजता मैदानाचे निरीक्षण; वेळेआधी Lunch जाहीर)

चोप्रा पुढे म्हणाले की, रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर देखील 40 धावा जोडू शकतील आणि त्यांच्याकडे असलेल्या गोलंदाजीमुळे ते 20 विकेट्स घेण्यास सक्षम असतील. दुसरीकडे, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी यजमान कगिसो रबाडाचा दिवस चांगला जाईल अशी असेही 44 वर्षीय माजी सलामीवीर म्हणाले. आकाश चोप्रा यांच्यानुसार दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा दुसऱ्या दिवशी 2 विकेट घेऊ शकतो. रबाडाला रविवारी एकाही विकेट मिळाली नाही. दरम्यान, टीम इंडियाचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी 117 धावांची सलामी केली जी संघासाठी खूप फायदेशीर ठरली. मयंक 60 धावा करून माघारी परतला तर राहुल अद्याप 122 धावा करून नाबाद खेळत आहे.

अग्रवालला लुंगी एनगिडीने 60 धावांवर बाद केले परंतु राहुलने पुढे मोर्चा संभारत शानदार शतक झळकावले, जे इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर केलेल्या 129 धावांच्या खेळीनंतरचे या वर्षातील प्रदीर्घ फॉर्मेटमधील दुसरे ठरले. मयंक पाठोपाठ चेतेश्वर पुजारा देखील बाद झाला आणि कर्णधार विराट कोहलीही 35 धावा करून बाद झाला. पण अजिंक्य रहाणे खऱ्या हेतूने फलंदाजी करत राहिला आणि संयमाने राहुलला साथ देत फलंदाजी करत राहिला.