IND vs SA 1st Test Day 1: रोहित शर्मा-मयंक अग्रवाल यांनी केली भारताच्या डावाची सुरुवात, 47 वर्ष जुना विक्रम मोडीत
रोहित शर्मा, मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी डावाची सुरुवात केली आणि 20 ओव्हरमध्ये 55 धावा केल्या आहेत. भारताची अजून एकही विकेट पडली नाही. रोहित या मॅचद्वारे पहिल्यांदा टेस्ट सामन्यात ओपनर म्हणून फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारतासाठी रोहित आणि मयंकसलामीला मैदानात उतरले आणि यासह एका विक्रमाची देखील नोंद केली. (IND vs SA 1st Test: विराट कोहली ने केली सौरव गांगुली च्या 'या' रेकॉर्ड ची बरोबरी; दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एमएस धोनी, सचिन तेंडुलकर सह या यादीत झाला समावेश)

रोहित आणि मयंक, टीम इंडियाची नवीन सलामीची जोडी ही 47 वर्षात पहिली सलामीची जोडी ठरली जिने भारतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात केली आहे. यापूर्वी सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि रामनाथ पारकर (Ramnath Parkar) या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात करून दिली होती. भारताचा दुसरा सलामीवीर केएल राहुल याला त्याच्या खराब कामगिरीमुळे आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं आहे. राहुलला संघातून वगळल्यानंतर रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय अमलात आणला गेला. मयंकने आतापर्यंत भारताकडून 4 कसोटी सामने खेळले आहेत, ते चारही सामने भारताबाहेर खेळले आहेत. भारतीय मैदानावर मयांकचा हा पहिलाच सामना आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात 2015 मध्ये झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला होता. मंगळ अनेक वर्ष आफ्रिका संघाला भारतात टेस्ट मालिका जिंकता आली नाही. तर, टीम इंडिया आफ्रिकाविरुद्ध आपला रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, रोहितसमोर देखील परीक्षेची वेळ आहे. मधल्या फलित फलंदाजी यश मिळाले नसल्याने त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. आणि यंदाच्या मालिकेत तो कसा खेळ करतो यावर त्याचे टेस्ट संघातील स्थान अवलंबून आहे.