विराट कोहली, सौरव गांगुली (Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनेक कारणांसाठी खूप खास ठरणार आहे. या सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरत माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या एका  विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून विराटने गांगुलीची बरोबरी केली आहे. आणि आता दोघेही संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गांगुलीने भारताकडून 49 कसोटी सामन्यांत नेतृत्व केले होते आणि आजचा सामना कोहलीचा कर्णधार म्हणून49 वा आहे. विशाखापट्टणम टेस्ट मॅचसह विराट गांगुलीच्या पंक्तीत येऊन  उभा राहिला आहे. दरम्यान, सर्वाधिक कसोटींमध्ये कर्णधारपदाचा विक्रम सध्या महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नावावर आहे. धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. (IND vs SA 1st Test: ऐतिहासिक कामगिरीवर विराट कोहली याची नजर, पहिल्या टेस्ट मॅचमध्ये असामान्य रेकॉर्ड करण्याची संधी)

दुसरीकडे, विराटने धोनी आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची देखील बरोबरी केली आहे. धोनी आणि तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आठ सामने खेळले आहेत. तर आजच्या मॅचपूर्वी विराटने आफ्रिकाविरुद्ध 7 सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. त्यामुळे आजचा सामना हा कोहलीचा आफ्रिकाविरुद्ध कर्णधार म्हणून आठवा सामना आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या आठ पैकी तीन सामने जिंकले, तीन गमावले आणि दोन सामने ड्रॉ राहिले. तेंडुलकरच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना, भारताने आठपैकी दोन सामने जिंकले, पाच सामने गमावले आणि एक सामना ड्रॉ राहिला. दुसरीकडे, कोहलीच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेला चार वेळा पराभूत केले, दोनदा पराभचा सामना केला आणि एकदा सामना ड्रॉ केला.

दरम्यान, आजच्या मॅचबद्दल बोलले तर विराटने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅचच्या एक दिवसाआधीच टीम इंडियाने त्याचा प्लेयिंग इलेव्हन घोषित केला होता. रोहित शर्मा याला सलामीला पाठवले आहे तर, रिषभ पंत याला वगळत रविचंद्रन अश्विन याचा समावेश केला आहे.