IND vs SA 1st Test: ऐतिहासिक कामगिरीवर विराट कोहली याची नजर, पहिल्या टेस्ट मॅचमध्ये असामान्य रेकॉर्ड करण्याची संधी
विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज आहेत. तीन टी-20 सामन्यांची मालिका अनिर्णीत राहिली होती, पण विराट कोहली कसोटीत पाहुण्यांना कडक स्पर्धा देण्यास तयारी करत आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेसह टीम इंडियाच्या घरच्या सीजनची सुरुवात होणार आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे असणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेत विराट चांगल्या फॉर्ममध्ये होता. आणि आफ्रिकाविरुद्ध त्याला त्या फॉर्मची पुनरावृत्ती करायला उत्सुक असेल. आजवर क्रिकेट विश्वात असा एकही रेकॉर्ड नाही ज्याला विराटने आपल्या नावावर केले नाही. आणि आता पुन्हा कोहली एक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यास सज्ज होत आहे. (IND vs SA Test 2019: 'या' 5 खेळाडूंमधील लढत बनवणार भारत-दक्षिण आफ्रिका मालिका रंगतदार)

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोहलीचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड खूप चांगला झाला आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टेस्ट मालिकेमध्ये विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21,000 धावा करण्यासाठी 281 धावांची गरज आहे. विराटने आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,719 धावा केल्या आहेत.  त्याने टेस्टमध्ये 6749, वनडे क्रिकेटमध्ये 11, 520 आणि टी-20 मध्ये 2450 धावा केल्या आहेत. आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये कोहलीला जर 281 धावा करण्यात यश मिळाले तर तो 21,000 धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनू शकतो. हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी वेगवान खेळाडू होण्यासाठी त्याला 41 डावात आणखी 281 धावांची आवश्यकता आहे. सध्या, मास्टर-ब्लास्टर सध्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने 473 धावांत सर्वात जलद 21,000 धावांचा टप्पा गाठला आहे. तर वेस्ट इंडिजचा महान ब्रायन लारा (Brian Lara) याने 485 धावांत हा पराक्रम केला होता. लारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आजवर 432 डाव खेळले आहेत.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने चांगला फॉर्म नोंदविला आहे. त्याने आफ्रिकाविरुद्ध 9 सामन्यांत 47.37 च्या सरासरीने 758 धावा केल्या आहेत. यात 2 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय, टेस्ट क्रिकेटमध्ये 25 शतक झळकावणाऱ्या कोहलीला आफ्रिकाविरूद्ध भारतात एकही शतक ठोकता आले नाही. चार वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यात विराटच्या बॅटमध्ये एकही शतक निघाले नाही. आशा वेळी, यंदा तरी विराट शतकांचा हा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा आहे.