IND vs SA 1st Test 2021: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Virat Kohli) सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. टीम इंडियाला (Team India) पहिल्या डावात 327 धावांवर गुंडाळल्यावर यजमान संघाचा पहिला डाव 197 धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर आनंदायी दृश्य पाहायला मिळाले. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या दिवशी आनंदी मूडमध्ये दिसत होता. यामागचे कारणही स्पष्ट होते, संघाने सेंच्युरियन येथे तिसऱ्या दिवशी पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व राखले होते. कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला आणि मैदानातच नाचू लागला. (IND vs SA 1st Test Day 3: भारताचा वेगवान गोलंदाज Mohammad Siraj ने विकेट घेतल्यावर केले क्रिस्टियानो रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन!)
सेंच्युरियन कसोटीच्या तिसर्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या विकेट पडल्यावर ड्रिंक ब्रेक झाला आणि विराट कोहलीने नाचायला सुरुवात केली. झाले असे की ब्रेकच्या वेळी मैदानावर गाणे वाजत होतं आणि कोहली नाचायचा मोह आवरू शकला नाही व गमतीशीर मूडमध्ये काही स्टेप्स दाखवायला सुरुवात केली. कोहलीच्या मैदानावरील या उत्स्फूर्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, चाहते देखील त्याचे फॅन होत आहेत. यापूर्वी देखील खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यादरम्यान, कोहली काहीवेळा चाहत्यांशी संवाद साधताना दिसला, तर कधी त्यांना संघासाठी अधिक उत्साहाने चिअर करण्यास सांगता दिसला. इतर प्रसंगी तो स्टेडियमवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यावर किंवा ढोलाच्या आवाजावर नाचू लागायचा.
Virat Kohli dancing to the tune. India is having a great day on field ❤😻🥳🥳...
~Virat and his dance steps are pure bliss to watch 😁❤️@imVkohli pic.twitter.com/ZocAuhYw3y
— Lavanya Jessy (@LavanyaJessy) December 28, 2021
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे तर तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी दाखवत दक्षिण आफ्रिकेचा पहिला दावा 197 धावात आटोपला. भारताने आता जवळपास 146 धावांची आघाडी घेतली असून चौथ्या दिवशी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसमोर ही आघाडी 300 ते 400 च्या पार नेण्याच्या नेण्यात असेल. दरम्यान सामन्यावर टीम इंडियाची पकड घट्ट असली तरी सामन्याच्या प्रक्रियेवर भारताचा भक्कम भक्कमपणा आहे हे नाकारता येत नसले तरी,33 वर्षीय विराट पुन्हा एकदा आपली चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला आणि पहिल्या डावात 94 चेंडूत 35 धावा करून बाद झाला.