भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021 च्या अनेक सामन्यात खेळाडूंना वर्णद्वेषी प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना देखील याला अपवाद ठरला नाही. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) विजेतेपदाच्या अंतिम सामन्यात देखील चाहत्यांकडून वर्णद्वेषी आणि अश्लील टिप्पण्याही थांबल्या नाही व सामन्याच्या पाचव्या दिवशी वर्णद्वेषी टिप्पणीचे नवीन प्रकरण समोर आले आहे. न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) विरुद्ध साऊथॅम्प्टन (Southampton) मैदानावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंड संघ फलंदाजी करीत असताना स्टेडियममधील प्रेक्षकांमधील काही लोकांनी किवी फलंदाज रॉस टेलरविरोधात वर्णद्वेषी भाष्य केले. (IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडची शिस्तबद्ध बॉलिंग, दिवसाखेर भारताकडे 32 धावांची आघाडी; सामना रोमांचक स्थितीत)

या घटनेसंदर्भात एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले आणि आयसीसीचे वेधले. यूजरने लिहिले की येथे उपस्थित काही प्रेक्षक दिवसभर न्यूझीलंड संघाविरुद्ध अपशब्द वापरत आहेत तर फलंदाज रॉस टेलरविरोधात वर्णद्वेषी भाष्यही करीत आहेत. न्यूझीलंडच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल नंतर दोन जणांना मैदानातून बाहेर केले गेले. साऊथॅंप्टनमधील सामन्याची पाहणी करण्यासाठी जे सुरक्षा अधिकारी कार्यरत होते त्यांच्याकडून आयसीसीला अद्याप संपूर्ण अहवाल मिळालेला नाही. ‘Stuff’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा वैयक्तिककडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. टेलरने सामन्याच्या पहिल्या डावात 11 धावा केल्या. आयसीसीच्या प्रवक्त्याने ‘स्टफ’ला सांगितले की, “आम्हाला न्यूझीलंडच्या खेळाडूंवर निर्देशित केल्याचे वृत्त प्राप्त झाले. आमच्या सुरक्षा पथकाला दोषींना ओळखण्यात यश आले आणि त्यांना मैदानातून काढून टाकले. आम्ही क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करणार नाही.”

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर आज, 23 जून रोजी निर्णायक सामन्याचा अखेरच्या दिवसाचा सामना रंगणार आहे. सामन्याचा पहिल्या व चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार आज राखीव दिवशी सामना होणार आहे. भारताने पहिल्या डावात 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघाने 249 धावांवर मजल मारली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 64/2 अशी होती.