IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर भारताची स्थिती 30 ओव्हरमध्ये 64/2 अशी होती. दिवसाखेर भारताने किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील कसोटी अजिंक्यपदाच्या विजेतेपदाचा हा सामना आता रोमांचक स्थितीत येऊन पोहचला आहे. मोहम्मद शमी व इशांत शर्माच्या शानदार गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर आटोपला. त्यांनतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 12 धावा आणि कर्णधार विराट कोहली 8 धावा करून खेळत होते. शुभमन गिल दुसऱ्या डावात 8 धावाच करू शकला तर रोहित शर्मा 30 धावांची खेळी केली. दुसरीकडे, किवी संघाकडून टिम साउदीला (Tim Southee) दोन विकेट्स मिळाल्या. (IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टनमध्ये Tim Southee ने गाठला 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा पल्ला, Shubman Gill याला केलं पायचीत)
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यास पावसामुळे विलंब झाला. पण अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजता सामना सुरु झाला. आजच्या दिवशी मोहम्मद शमीने त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. तथापि किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनची संयमी खेळीने भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली. विल्यमसन एकाकी झुंज दिली. पहिली विकत पडताच आलेला केन 7 विकेट्सनंतरही क्रिजवर टिकून होता. यानंतर किवी कर्णधार आपले अर्धशतक पूर्णकारेल असे दिसत असताना इशांतने त्याला विराट कोहलीकडे झेलबाद केलं. विल्यमसनने तब्बल 177 चेंडूत 49 धावांची खेळी केली. विल्यम्सन वगळता सलामीवीर डेव्हन कॉनवेने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. विल्यम्सन बाद झाल्यावर देखील तळाच्या खेळाडूंच्या खेळीच्या जोरावर संघाने 32 धावांची नाममात्र आघाडी घेतली.
न्यूझीलंडसाठी काईल जेमीसनने 29, टीम साउदीने आणि टॉम लॅथमने प्रत्येकी 30 धावांचे छोटेखानी खेळी करत योगदान दिले. दिवसाच्या सुरुवातीला पहिल्या डावात न्यूझीलंडने पाच विकेट्स गमावल्या होत्या, एका बाजू केन विलियम्सनने भक्कमपणे सांभाळली होती. त्याला 6व्या विकेटसाठी सुरुवातीला कॉलिन डी ग्रँडहोमने चांगली साथ दिली होती मात्र, तो 30 चेंडूत 13 धावा करुन माघारी परतला. दुसरीकडे, भारताकडून मोहम्मद शमीने 26 ओव्हरमध्ये 76 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त इशांतने 3 विकेट्स, रविचंद्रन अश्विनने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.