IND vs NZ WTC Final 2021: विजेतेपदाचा निर्णायक सामना अनिर्णीत राहिल्यास टीम इंडियाला फायदा की नुकसान?
केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनल सामन्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या बहुप्रतीक्षित सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला होता. 2019 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेच्या निर्णायक अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघांच्या चमकदार कामगिरी बजावली. हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा होती, परंतु साऊथॅम्प्टनच्या (Southampton) हवामानाने अंतिम सामन्याची मजा खराब केली. डब्ल्यूटीसी फायनल (WTC Final) सामन्याच्या चार दिवसांचा खेळ झाला आहे यापैकी पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पूर्णपणे धुऊन निघाला तर दुसर्‍या दिवशी खराब लाईटमुळे नियोजित वेळेपूर्वीच खेळ थांबवावा लागला. फक्त तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ झाला असून चार दिवशी एकूण 141.1 ओव्हरचा खेळ झाला आहे. (IND vs NZ WTC Final 2021: इंग्लंडमध्ये Ishant Sharma याचा डंका, विकेट घेताच केले 2 मोठे कीर्तिमान)

आता दोन दिवसांचा खेळच शिल्लक राहिला आहे त्यामुळे सामन्याने अनिर्णीत निकालाकडे वाटचाल सुरु केली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही करत सामन्यात पाऊस महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अशास्थितीत दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. पण हा सामना अनिर्णीत राहिल्यास भारतीय संघाचे नुकसान होईल. टीम इंडियाला संयुक्त विजेते घोषित गेल्यास ते आयसीसी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान गाठण्याची संधी गमावतील. टीम इंडिया दुसर्‍या क्रमांकावर राहील. त्यांची 122 रेटिंग असेल तर 123 रेटिंगसह किवी संघ नंबर- 1 च्या सिंहासनावर कायम राहील. दुसरीकडे टीम इंडियाने सामना जिंकला असता तर विजेतेपदासह रँकिंगमध्येही त्यांना फायदा झाला असता. 124 रेटिंग गुण मिळवत त्यांनी किवी संघाला दुसऱ्या स्थानावर ढकलत अव्वल स्थान मिळवले असते.

दरम्यान, न्यूझीलंडने डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना जिंकला तर त्यांचे 126 रेटिंग गुण झाले असते आणि ते पहिल्या क्रमांकावर कायम राहिले असते. अशापरीस्थितीत डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ड्रॉ किंवा अनिर्णित राहिल्यास टीम इंडियाला तोटा होईल, तर किवी संघाचा फायद्यात राहील. लक्षात घेण्यासारखे म्हणजे साउथॅम्प्टन येथे पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर गुंडाळला तर किवी संघाने 55 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 105 धावा केल्या आहेत.