IND vs NZ WTC Final 2021: भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) साऊथॅम्प्टन (Southampton) येथे भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) संघादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship_ फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी किवी सलामीवीर डेव्हन कॉनवेला (Devon Conway) वैयक्तिक 54 धावांवर बाद केले आणि दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा शर्मा आता भारतीय क्रिकेट संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विशेष विक्रम माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावावर नोंदवण्यात आला होता. इंग्लंडमध्ये 13 सामने खेळताना कपिल देव यांनी 22 डावात 43 विकेट्स घेतले आहेत. तसेच इशांत शर्माच्या नावावर आता इंग्लंडमध्ये 44 विकेट्सची नोंद झाली असून इशांतने 13 सामन्यांच्या केवळ 20 डावांमध्ये हा खास पराक्रम केला आहे.
शर्माने या दरम्यान इंग्लंडमध्ये दोनदा पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. टीम इंडियाकडून इंग्लंडमध्ये इशांत शर्मा आणि कपिल देव यांच्याशिवाय अनिल कुंबळे (36), बिशन सिंह बेदी (35) आणि झहीर खान (31) यांनी विकेट्स घेण्याची विशेष कामगिरी केली आहे. याशिवाय डेव्हन कॉनवेच्या विकेटसह इशांत शर्मा देशाबाहेर 200 विकेट्स घेणारा चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या 61 व्या सामन्यात हा विशेष कारनामा केला आहे. शर्माशिवाय अनिल कुंबळे (269), कपिल देव (215) आणि झहीर खान (207) यांनी देशाबाहेर दोनशेहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे तर पहिल्या डावात भारतीय संघ 217 धावांवर बाद झाल्यावर न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. कॉनवे आणि टॉम लाथम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली. अश्विनने लॅथमला बाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली. लाथमने 104 चेंडूत 30 धावा केल्या ज्यात तीन चौकारांचाही समावेश होता. स्टंपच्या वेळी कर्णधार केन विल्यमसन (37 चेंडूत 12 धावा) आणि रॉस टेलर शून्यावर क्रीजवर होते. भारताकडून इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना आतापर्यंत प्रत्येकी एक विकेट मिळाली. दरम्यान, किवी संघाने पहिल्या डावात अद्याप 101 धावांवर 2 विकेट्स गमावल्या असून ते टीम इंडियाच्या 116 धावांनी पिछाडीवर आहेत.