IND vs NZ ODI 2020: दुखापतग्रस्त रोहित शर्मा च्या जागी मयंक अग्रवाल ला वनडेत संधी, पृथ्वी शॉ सोबत करणार डावाची सुरुवात
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/ICC)

माउंट मौंगानुईमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याला दुखापत झाल्याने टीम इंडियाला (India) मोठा धक्का बसला. पोटरीच्या दुखापतीमुळे रोहितला न्यूझीलंडविरुद्ध आगामी वनडे आणि कसोटी मालिकेलादेखील मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी मयांक अग्रवालला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे, तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बोर्डानेही संघाची घोषणा केली आहे. रोहितच्या जागी लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्यासह मयांक वनडे संघात तिसरा सलामी फलंदाज म्हणून सामिल झाला आहे. पृथ्वी आणि मयंक न्यूझीलंडमध्ये होणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलामी जोडी म्हणून म्हणून "निश्चितपणे सुरुवात" करतील, तर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर विकेटकिपर आणि फलंदाजांची भूमिका बजावेल, असे विराट कोहलीने हॅमिल्टनमधील मालिका सुरु होण्याआधी पत्रकार परिषदेत पुष्टी केली. (न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वी शॉ, शुभमन गिल, नवदीप सैनी या युवा खेळाडूंना संधी)

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अग्रवालची शिखर धवनच्या वेस्ट इंडीजविरुद्ध घरातील वनडे मालिकेदरम्यान करण्यात आली होती. तेव्हा त्याने राखीव सलामी फलंदाज म्हणून कामगिरी बजावली होती. दुसरीकडे, कसोटी संघात रोहितच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, राहुल आणि पृथ्वीसह तिसरा सलामी फलंदाज असेल. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन रोहित मैदानाबाहेर गेला होता. त्यावेळी तो 60 धावांवर खेळत होता. त्याच्या जागी शिवम दुबे फलंदाजीला आला. तो फिल्डिंगसाठीही आला नव्हता.

न्यूझीलंडलाही मोठा झटका बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांचा नियमित कर्णधार केन विल्यमसन पहिल्या दोन वनडे सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टॉम लाथम किवी संघाचे नेतृत्व करेल, तर त्याच्या जागी मार्क चैपमैनची निवड झाली आहे. तिसर्‍या टी-20 दरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. यानंतर त्याला अखेरच्या दोन टी-20 सामन्यांना मुकावे लागले होते. टीम मॅनेजमेंटच्या मते, विल्यमसनच्या तिसर्‍या वनडेबद्दल शंका आहे पण तो कसोटी मालिका खेळेल असे स्पष्ट केले आहे.