न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वी शॉ, शुभमन गिल, नवदीप सैनी या युवा खेळाडूंना संधी
Prithvi Shaw, Shubman Gill, Navdeep Saini (Photo Credit: Facebook And Instagram)

न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या (India vs New Zealand) कसोटी मालिकेसाठी नुकतीच बीसीसीआयने भारतीय संघाची यादी (Test Squad) जाहीर केली आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), शुभमन गिल (Shubman Gill) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत चांगले प्रदर्शन करत न्यूझीलंडच्या संघाला 5-0 असे पराभूत केले होते. यामुळे 2 सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करून दाखवेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. पृथ्वी शॉ याने कसोटी संघात पुनरागमन केले आहे, तर शुभमन गिल याला पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आली आहे. याशिवाय दुखापतग्रस्त भारतीय गोलंदाज इशांत शर्मालाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन आणि हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे संघाबाहेर पडावे लागले होते. यातच सलामीवीर रोहित शर्माच्याही खांद्याला दुखापत झाली असून त्याला उर्वरित न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले आहे. नुकतीच भारतीय निवड समितीने, कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यासोबतच नवदीप सैनीनेही कसोटी संघात स्थान मिळवले आहे. निवड समितीने इशांत शर्मालाही भारतीय संघात संधी दिलेली असली तरीही तो संघात खेळेल की नाही हे त्याच्या फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार आहे. भारतीय संघ 3 एकदिवसीय सामना खेळाल्यानंतर 2 कसोटी सामने खेळणार आहे. हे देखील वाचा- Kane Williamson Ruled 0ut: एकदिवसीय मालिका आधीच न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे केन विल्यमसन सुरुवातीच्या 2 सामन्यांना मुकणार

एएनआयचे ट्वीट-

भारतीय कसोटी संघ-

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा (फिटनेस टेस्टच्या निकालावर स्थान अवलंबून असेल)