न्यूझीलंडचा (New Zealand) अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरची (Mitchell Santner) भारताविरुद्ध (India) दोन कसोटींपैकी एकाही सामन्यात किवी संघाच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली नाही. तरीही त्याने आपली उपस्थिती जाणवून दिली. वानखेडेवरील भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी दरम्यान, डावखुरा फिरकीपटूचे त्याच्या जबरदस्त प्रयत्नांसाठी सर्वांनी भरभरून प्रशंसा केली. दुसऱ्या कसोटीच्या भारताच्या पहिल्या डावात वानखेडेवरील प्रेक्षकांनी पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून खेळत असलेल्या सँटनरचा एक्रोबॅटिक खेळ पाहिला. 46 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, श्रेयस अय्यरने विल्यम सोमरविलच्या गोलंदाजीवर मिड-विकेटवर शॉट खेळला आणि तो षटकार जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज दिसत होता. तथापि, 29 वर्षीय बदली क्षेत्ररक्षकाने काही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवले. (IND vs NZ Mumbai Test: न्यूझीलंडचा विक्रमवीर एजेज पटेलचा मुंबई क्रिकेट असोसिएशनने विशेष भेट देऊन केला सत्कार)
सँटनरने अवास्तव हवेत सूर मारून चेंडू पुन्हा सीमारेषेच्या आत पडला. तो सीमारेषेच्या जवळ उभा असताना, त्याने शक्य तितक्या उंच उडी मारली आणि वरवर पाहता एक अप्रतिम झेल घेतला. मात्र, ते पूर्ण करताच तो दोरीवर पडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. आणि त्याने योग्य वेळेत चेंडू आत फेकला. यामुळे षटकार बचावला आणि आपल्या सहकाऱ्यांकडून चांगलीच दाद मिळवली. अशा प्रकारे, मिचेल सँटनरने सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतानाही "बेस्ट सेव्ह ऑफ द मॅच" पुरस्कार जिंकला. त्याच्या प्रयत्नांसाठी 29 वर्षीय सॅन्टनरला एक लाख रुपये पुरस्कार रक्कमही मिळाली.
Terrific work by Mitchell Santner, he saved 5 runs for his team. pic.twitter.com/KUcmE0SGbB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 3, 2021
दरम्यान, न्यूझीलंडसाठी भारताचा दौरा खूपच कठीण राहिला. आयसीसी टी-20 विश्वचषक अंतिम सामन्याच्या अगदी काही दिवसानंतर किवी संघात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरला. सुरुवातीला त्यांनी तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका 0-3 ने गमावली. त्यानंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1 असा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीत यजमान भारताकडून 372 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे न्यूझीलंड संघ आयसीसी पुरुष कसोटी संघ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मुंबईत या दणदणीत पराभवामुळे न्यूझीलंडची भारतात मालिका जिंकण्याची प्रतीक्षाही वाढली आहे आणि गेल्या 33 वर्षांनंतर भारतात कसोटी सामने जिंकण्याचे त्यांचे स्वप्नही भंगले. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग होती.