
न्यूझीलंड (New Zealand) आणि भारत (India) आज टी-20 मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात माउंट मौंगानुई (Mount Maunganui) येथील बे ओव्हल क्रिकेट मैदानात आमने-सामने येत आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी चौथ्या मॅच प्रमाणेच टीम इंडियाने प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहे. नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli ला विश्रांती देण्यात आली आहे. संजू सॅमसन प्लेयिंग इलेव्हनमध्ये कायम ठेवण्यात आल्याने तो केएल राहुलसह डावाची सुरुवात करेल आणि रोहित तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. दुसरीकडे, दुखापतीमुळेविल्यमसनला सलग दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले आहे आणि टीम साऊथी किवी संघाचे नेतृवं करणार असेल. मालिकेचा पाचवा सामना किवी संघाचा नियमित कर्णधार विल्यमसनच्या होम ग्राऊंडवर खेळला जात आहे. (IND vs NZ 2020: न्यूझीलंड A विरुद्ध शुभमन गिल ने ठोकले दुहेरी शतक, पहिला अनधिकृत टेस्ट सामना ड्रॉ)
भारतीय संघ पहिल्यांदा पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे आणि 5-0 च्या फरकाने जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. जर हा सामना भारताने जिंकला तर पाच सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करणारा हा पहिला देश असेल. टीम इंडियाने यावर्षी खेळलेल्या सर्व 7 सामने जिंकल्या आहेत, तर न्यूझीलंडला शेवटच्या 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, टीम आता मालिका 5-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल.
असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन:
टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, टिम सेफर्ट , रॉस टेलर, टॉम ब्रूस, डेरील मिशेल, मिशेल सॅटनर, ईश सोढी, टिम साउदी, हमिश बेनेट आणि स्कॉट कुग्गेलैन