IND vs NZ (Photo Credit: X & Jio Cinema)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium)  खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ रोमहर्षाने भरलेला होता,  मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ 235 धावांवरच मर्यादित राहिला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 18 धावा करून बाद झाला तर विराट कोहली 04 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने दोन बळी घेतले.  (हेही वाचा  -  IND vs NZ 3rd Test 2024 Day 1 Scorecard: भारताला तिसरा धक्का; यशस्वी जयस्वाल 30 धावाकरून तर सिराज शुन्यावर बाद )

भारतीय संघाला चौथा धक्का 19व्या षटकात विराट कोहलीच्या रूपाने बसला. नाईट वॉचमन मोहम्मद सिराज बाद झाल्यानंतर कोहली क्रीजवर आला. 6 चेंडूत 4 धावा करून कोहली धावबाद झाला.

भारताकडून आज शुभमन गिलने चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करत त्यांने 38 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. यशश्वी जयस्वालने देखील सुरुवातीचा चांगली खेळी केली त्यांने 52 चेंडूत 30 धावा केल्या पंरतू एक एजाज पटेलला एक चुकिचा फटका खेळताना तो बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेला नाईट वॉचमेन मोहम्मद सिराज हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली फ्लॉप ठरले आहे. रोहित शर्मा हा केवळ 18 धावाकरून बाद झाला तर विराट कोहली हा 4 धावांवर बाद झाला.