भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand( दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) दमदार शतक झळकावून सर्वांची मने जिंकली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी एक वेळी टीम इंडियाची अवस्था बिकट होती, पण सलामीवीर अग्रवालने संयमाने किवी गोलंदाजांचा सामना केला आणि आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर टीम इंडियाचा डाव सांभाळला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मयंकने 120 धावा करून खेळत होता. मयंकने बऱ्याच दिवसांनी मोठी खेळी खेळली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने एक खुलासाही केला. केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये आलेल्या मयंकने पहिल्या कसोटीत केवळ 13 आणि 17 धावा केल्या, पण दुसऱ्या कसोटीत तो लयीत परतला आणि फॉर्मेटमध्ये चौथे शतक ठोकून संघाला अडचणीतून सावरले. (IND vs NZ 2nd Test Day 1: वानखेडेवर पहिल्या दिवशी टीम इंडियाचा दबदबा, शतकवीर मयंक अग्रवालने सांभाळला मोर्चा; 4 विकेट घेऊन Ajaz Patel चमकला)
या कसोटीपूर्वी माजी दिग्गज सुनील गावस्करच्या फलंदाजीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मयंकने आपल्या पद्धतीत थोडा बदल केला, जो कामी आला. गावस्कर यांनी समालोचन सत्रादरम्यान, त्यांनी अग्रवालला बॅक-लिफ्ट कमी करण्याचा सल्ला कसा दिला होता याबद्दल बोलले. त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सलामीवीर म्हणाला. मयंक म्हणाला, “त्यांनी मला सांगितले की मी माझ्या डावाच्या सुरुवातीला बॅट थोडी कमी ठेवण्याचा विचार केला पाहिजे. मी ते थोडे उंच धरले. मी इतक्या कमी वेळात ते बदलू शकत नाही. त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला त्याच्या खांद्याची स्थिती लक्षात आली.” दरम्यान अग्रवालने निःसंशयपणे शानदार खेळी खेळली आहे पण त्याला हे देखील माहित आहे की रोहित शर्मा आणि केएल राहुल या क्षणी बाहेर बसले आहेत व ही नियमित सलामी जोडी परताच मयंकला पुन्हा बाहेर बसावे लागेल, पण द्रविडने त्याला प्रोत्साहन दिले, ज्याच्या जोरावर मयंकने या सर्व गोष्टींचा विचार न करता शानदार खेळी केली.
What does it mean to score a ton in whites? 🤔@mayankcricket expresses his run of emotions to @prasidh43 after his gritty century on Day 1 of the 2nd @Paytm #INDvNZ Test at Wankhede. 😎 😎 - By @28anand
Full interview 🎥 🔽 #TeamIndiahttps://t.co/1hVDdntTA1 pic.twitter.com/v7u9mR8aTJ
— BCCI (@BCCI) December 3, 2021
दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 4 गडी बाद 221 धावा झाल्या आहेत. मयंकसोबत रिद्धिमान साहा 25 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान संघ मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असेल.