Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team  Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात 255 धावांवर ऑलआउट झाला आहे. यासह पाहुण्या संघाने भारतासमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

टाॅम लॅथमची 86 धावांची सर्वाधिक खेळी

दुसऱ्या डावात फलंदाजासाठी आलेल्या न्यूझीलंडकडून कर्णधार टाॅम लॅथमने 86 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. तर टॉम ब्लंडेलने 41 धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजाकडून वॉशिंग्टन सुंदर चार विकेट तर रवींद्र जडेजा 3 आणि आर अश्विनने 2 विकेट घेतल्या आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024: पुणे कसोटीत भारतावर पराभवाचा धोका, 7 वर्ष जुना रेकॉर्डची होणार पुनरावृत्ती?)

पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या सात विकेट

त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 259 केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली कामगिरी केली. कॉनवेने 141 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. मिचेल सँटनर 33 धावा करून बाद झाला. टॉम लॅथम 15 धावा करून बाहेर पडला. भारताकडून सुंदरने 7 आणि अश्विनने 3 विकेट घेतल्या.

भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद

प्रत्युत्तरात, भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद झाला. दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला काय खास सुरुवात करता आली नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी 30-30 धाव केल्या. तर रवींद्र जडेजाने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 1 धावावर बाद झाला त्यानंतर भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्या. दुसरीकडे न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर सर्वाधिक सात विकेट घेतल्या.