न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसर्या सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने फलंदाजीने निराश केले असले तरीही पहिल्या डावात आपल्या क्षेत्ररक्षणातून चाहत्यांची मने जिंकण्यात त्याला निश्चितच यशस्वी झाला. सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंड क्रिकेट संघातील दोन महत्त्वाच्या फलंदाज म्हणजेच दोन्ही सलामी फलंदाजांचा झेल पकडून विरोधी संघाला बॅकफूटवर आणण्यात कोहलीने मोठी भूमिका बजावली. ऑकलँडच्या मैदानात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेटने विजय मिळवता. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने आता 2-0 ने आघाडी घेतली आहे. (IND vs NZ 2nd T20I: प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाचा धमाका, न्यूझीलंडचा 7 विकेटने पराभव करत मालिकेत घेतली आघाडी)
भारत-न्यूझीलंडमधील दुसर्या टी-20 दरम्यान दोन्ही संघांनी अनेक मनोरंजक विक्रमांची नोंद केली. एकीकडे विराटने रोहितला मागे टाकले तर सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यानेही विक्रमी कामगिरी केली. जाणून घ्या:
1. न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात खेळताना भारताचाहा तिसरा टी-20 विजय होता. विशेष म्हणजे टीम इंडियाने हे तिन्ही विजय ऑकलँडच्या इडन पार्क मैदानावर खेळत मिळवले आहे. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये भारताने एकूण 6 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 4 सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला.
2. 7 धावा केल्यावर राहुल टी -20 क्रिकेटमध्ये 1300 धावा करणारा फलंदाज ठरला. असं करणारा तो भारताचा सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी रोहित, कोहली, एमएस धोनी, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये 1300 धावा केल्या आहेत.
3. कर्णधार कोहलीने आजच्या सामन्यात दोन किवी फलंदाजांचा कॅच पकडून एका वेगळ्या कामगिरीची नोंद केली.आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा कोहली दुसरा भारतीय खेळाडू ठरला. कोहलीने टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 41 झेल घेतले आहेत, तर रोहितने आजवर 40 झेल पकडले आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम सुरेश रैना यांच्या नावावर आहे. रैनानेआंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 42 झेल घेतले आहेत.
4. न्यूझीलंडची सलामी जोडी मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये1000 धावांची भागीदारी पूर्ण केली.1000 धावांची भागीदारी करणारी ही दुसरी किवी जोडी बनली आहे. केन विल्यमसन आणि गुप्टिलच्या जोडीने 1151 धावा केल्या आहेत.
5. ईश सोधीने 1 विकेट घेताच टी-20 क्रिकेटमध्ये 50 गडी पूर्ण केले आहेत. न्यूझीलंडकडून 50 विकेट घेणारा तो चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी, टिम साउथी, नॅथन मॅक्युलम, मिशेल सॅटनर यांनी हा टप्पा पार केला आहे.
या मालिकेचा तिसरा टी-20 सामना बुधवारी 29 जानेवारी रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला जाईल. या सामन्यात न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल आणि टिम सेफर्ट यांनी प्रत्येकी 33-33 धावा केल्या, तर कॉलिन मुनरो 26 आणि रॉस टेलर 18 धावा करून बाद झाले. पण, भारताच्या अष्टपैलू खेळासमोर जास्त काळ टिकू शकले नाही. केएल राहुलने मालिकेतील दुसरे अर्धशतक केले, तर श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा मॅचफिनिशरची भूमिका बजावली आणि 44 धावा केल्या. रवींद्र जडेजाने आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने 2 गडी बाद केले.