संजय मांजरेकर-रवींद्र जडेजा (Photo Credit: IANS)

टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि माजी भारतीय क्रिकेटपटू तसेच विद्यमान भाष्यकार संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यातील संबंधांबद्दल सर्वांना माहिती आहे. जडेजा आणि मांजरेकर एकमेकांसोबत उभे राहू शकत नाही. अनेकदा त्यांना सोशल मीडिया साईट ट्विटरवर आमने-सामने येताना पहिले आहे. मागील वर्षी विश्वचषक दरम्यानच तर उदाहरण अजूनही सर्वांच्या लक्ष्यात असेलच. तेव्हापासून दोघांमध्ये मतभेद होताना दिसले. पण यावेळी सर्वांना चकित करून मांजरेकर यांनी जडेजाचे न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध नुकत्याच झालेल्या अंतिम कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी कौतुक केले आहे. भाष्यकार मांजरेकर यांनी जडेजाचे कौतुक करत मोठे विधान केले. (IND vs NZ 2nd Test: रवींद्र जडेजा ने न्यूझीलंडच्या नील वॅग्नर ला आऊट करण्यासाठी पकडला '2020 चा सर्वोत्कृष्ट कॅच', पाहा Video)

क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात जडेजाने न्यूझीलंडच्या नील वॅग्नरचा जबरदस्त झेल पकडला होता. जडेजाने मोहम्मद शमीच्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर हवेत उडी मारून आश्चर्यकारक कॅच पकडला होता. हा कॅच पाहिल्यानंतर मांजरेकरही जडेजाचे कौतुक केल्यावाचून राहू शकले नाही. क्रीडा सादरकर्ता रिद्धिमा पाठक यांनी ट्विटरवर जाडेजाच्या झेलचे कौतुक केले आणि विचारले, "ठीक आहे . तर..मला म्हणायचे आहे... काय .. आपण हे कसे करता?" यावर मांजरेकरने प्रतिक्रिया देत लिहिले, "सोप्पं आहे... फिडल म्हणून फिट व्हा आणि फिल्डिंगचा आनंद घ्या. जडेजाकडे हे दोन्ही गुण आहेत."

न्यूझीलंड आणि भारतमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल स्थानावरील टेस्ट संघाला 7 विकेटने पराभव पत्करावा लागला. पूर्ण मालिकेत फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. न्यूझीलंडने वनडे मालिकेनंतर टेस्ट मालिकेतही भारताचा क्लीन स्वीप केला. पाच दिवसाचा सामना तीन दिवसांच्या आत संपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टॉम लाथम आणि टॉम ब्लंडेलने अर्धशतकी कामगिरी केली. भारताने दिलेले 132 धावांचे लक्ष्य न्यूझीलंड सहजपणे मिळवणार असे वाटत असताना जसप्रीत बुमराहने 2 आणि उमेश यादवने एका किवी फलंदाजाला माघारी धाडले.